परतवाड़ा दी १९ – अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला मेळघाटसह अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विक्रीस आलेल्या सोयाबीनला पहिल्याच दिवशी 3500 ते 3700 रुपयापर्यंत क्विंटल मागे भाव देऊन खरेदी करण्यात आले अचलपूर बाजार समितीत अन्य शेतमाल पेक्षा सोयाबीनची खरेदी सर्वाधिक प्रमाणात केली जाते अचलपूर परतवाडा चांदुर बाजार सह धारणी चिखलदरा तसेच मध्य प्रदेशा तील सोयाबीन येथे विक्रीकरिता आणले जाते काल शुक्रवारी दिनांक 18 रोजी सोयाबीन खरेदी च्या मुहूर्तावर वासनी येथील शेतकरी शंकर पचारे व चिखलदरा तालुक्यातील तेल खार येथील किसन दहिकर या शेतकऱ्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करीत मोजमाप काट्याचे पूजन करून सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला गोपाल अँड गोपाल कंपनीमार्फत करण्यात आलेल्या या खरेदी मुहूर्ताच्या वेळी खंडेलवाल ट्रेडिंग रिद्धी सिद्धी ट्रेडिंग मित्तल ट्रेडर्स सतीशजी व्यास भिकुलाल तिवारी अशोक कुमार गुलाबचंद गोविंद सिरोया प्रदीप धोंडे गोकुल अग्रवाल पप्पू वर्मा फकीरा पांडे शिवा पेढेवाल सह अनेक शेतकरी आडते व्यापारी बाजार समितीचे संचालक व हमाल बंधू उपस्थित होते