वरुड/दि.२१ – गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याच्या गुप्त माहीतीवरून पोलीसांनी मुलताई चौक परिसरात सापळा रचला आणी वाहनासह गाईना ताब्यात घेउन जीवनदान दिल्याने वरुड पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन केल्याजात आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार,एका मिनीट्रकमधून गाई कत्तलीसाठी नेत असल्याच्या गुप्त माहीतीवरुन वरुड पोलिसांनी मुलताई चौक परीसरात सापळा रचला असता आरोपी हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम.एच. ४३ ए. डि.८६७४ हे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत असताना दिसून आला पोलीसांनी त्याला थांबवुन वाहणाची तपासणी केली असता वाहनामध्ये काही गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबुन जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था न करता जनावरांना वेदना होतील अशा पद्धतीने काहीही हालचाल न करता कोंबुन वाहतुक करीत असतांना मिळुन आले. या प्रकरणी वरुड पोलिसांनी पो.कॉ.मिलींद वाटाणे यांचे फिर्यादीवरुन वाहन क्र. एम.एच. ४३ ए. डि.८६७४ चा चालक अनिल गुनवंतराव नागले वय ३३ वर्ष रा.रायआमला ता.मुलताई जि.बैतुल (मध्यप्रदेश) विरुध्द कलम (११), (१) (ब) (ई) (आई) सहकलम ११९ सहकलम ८३/१७७, ६६/१९२ मोटर वाहन कायदा व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कायद्याान्वये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी ३ लाख रुपये किमतीचे वाहन व ६० हजार रुपये किंमतीच्या ३ गाई असा एकुन ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. हि कार्यवाही ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दिलीप श्रीराव, पो.कॉ. मिलींद वाटाणे, सचिन भाकरे आदींनी केली. या कार्यवाही मध्ये वाहनासह गाईना ताब्यात घेउन जीवनदान दिल्याने वरुड पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन केल्याजात आहे.