मराठी

किशोर रिठे व शिवाली देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न

विद्यापीठात व्हच्र्युअल सी-फोर वरुण आयोजन

अमरावती :- विद्यापीठाच्या व्हच्र्युअल सी-फोरवरुन ‘नैसर्गिक आपत्ती व रोगांचा प्रतिकार करणारी अरण्ये’ या विषयावर सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक व प्रमुख श्री किशोर रिठे यांचे, तर ‘मजबूत समाजाची जडणघडण’ व ‘एका सैनिकाची निर्मिती’ या विषयावर फ्लाईट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न झाले.
 व्याख्यानप्रसंगी विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करतांना श्री किशोर रिठे म्हणाले, निसर्ग संवर्धन काळाची गरज आहे, पण निसर्गचक्रात मानवाने हस्तक्षेप करुन निसर्गचक्राला हानी पोहोचवली आहे.  त्यामुळे निसर्ग लहरी झाला आहे.  वन्यप्राण्यांच्या परिसरावर मानवाने अतिक्रमण करुन वन्यप्राण्यांची हत्या, भक्षण करुन त्याने स्वत:वर अनेक संकटे ओढवून घेतली असून कोव्हिड – 19 असो वा डेंगू, चिकन गुनिया यांसारखे अनेक घातक आजार हे वनांमधूनच माणसात आले असल्याचे सांगून त्यांनी आपल्या व्याख्यानातून त्याबाबत सखोल प्रकाश टाकला. निसर्गाचे संवर्धन आणि वन्यप्राण्यांचे संरक्षण आजच्या काळात महत्वाचे झाले आहे.  वन्यप्राण्यांसोबतच निसर्ग संवर्धित झाला तर, मानवजाती या पृथ्वीतलावावर टिकून राहील, अन्यथा कोरोनासारखे संकट वारंवार मानवावर येत राहतील.  म्हणून नैसर्गिक आपत्ती व रोगांचा प्रतिकार करणारी अरण्ये किती महत्वाची आहेत, हे त्यांनी सहउदाहरण व्याख्यानातून स्पष्ट केले.
व्याख्यानप्रसंगी ‘एका सैनिकाची निर्मिती’ विषयाच्या अनुषंगाने शिवाली देशपांडे म्हणाल्या, सैनिक बनण्यासाठी व्यक्तीमध्ये कुठले गुणविशेष असावे लागते, सैनिक म्हणून काम करतांना कशाप्रकारे संकटांचा सामना करावा लागतो, देशाची सुरक्षितता किती महत्वाची असते आणि त्यासाठी सैनिक आपल्या प्राणाची सुद्धा आहुती देतात.  सैनिकाला सजक राहून कर्तव्य पार पाडावी लागतात.  सैनिक आहेत म्हणून आपण सुरक्षितरित्या जीवन जगू शकतो, असे सांगून सैनिकांच्या निर्मितीविषयीचे विविध पैलू त्यांनी व्याख्यानातून उलगडून दाखविले.
द्वितीय व्याख्यानप्रसंगी ‘मजबूत समाजाची जडणघडण’ विषयाच्या अनुषंगाने त्या म्हणाल्या, समाजात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात.  समाजामध्ये राहणा­या व्यक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.  समाजामध्ये घडणा­या वाईट गोष्टींवर केवळ टीका न करता आपल्या स्वत:मध्ये काय बदल करता येईल, याचा प्रत्येकाने प्रयत्न केला, तर ख­या अर्थाने सशक्त समाजाची निर्मिती होवू शकते.  आजच्या तरुण-तरुणींनी कोरोनासारख्या परिस्थितीत स्वत:ला बळकट करण्याची फार गरज आहे.  प्रहार संस्था कशी उभी झाली, तिची कार्यपद्धती आणि मजबूत समाजाच्या निर्मितीसाठी कोणते उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविल्या गेले, यावर त्यांनी प्रकाश टाकला.  मजबूत समाजाच्या जडणघडणीत सर्वांनी आपापल्या परीने सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
निवेदन व पाहुण्यांचा परिचय मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील व गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. मनिषा काळे यांनी करुन दिला.  वक्त्यांची व्याख्याने विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in  या संकेतस्थळावर व्हच्र्युअल सी-फोर अंतर्गत उपलब्ध आहे.  याशिवाय युट¬ूबवर सुद्धा उपलब्ध असून त्याचा जास्तीतजास्त लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने प्र-कुलगुरू तथा व्हच्र्युअल सी-फोरचे अध्यक्ष डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व व्हच्र्युअल सी-फोरच्या समन्वयक डॉ. मोना चिमोटे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button