कत्तलीकरिता जात असलेल्या ९ गाईला जीवनदान
पोलीस स्टेशन आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या सतर्कतेने
वरुड/दि. ९ – पोलीस स्टेशन आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या सतर्कतेमुळे कत्तलीकरिता नेत असलेल्या ९ गाईंना जीवनदान दिले. ही कार्यवाही शहरातील मुलताई चौक परिसरामध्ये आज पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
महाराष्ट्रात गौवंश हत्या बंदी कायदा असताना स:र्हास कत्तलीकरिता गौवंश हत्या सरु आहे. आज पहाटेच्या सुमारास पुन्हा ५ वाजता अवैध वाहतूक करणारी पांढुर्णा-अमरावती रस्त्यावरुन शहरातील मुलताई चौक येथे एम.एच.२७ एक्स ६३३२ क्रमांकाची भरधाव वेगाने जात असताना पकडण्यात यश आले. मात्र आरोपी गाडी सोडून घटनास्थळावरुन पळून गेले. गाडीमध्ये ४ बैल, ३ गाई, २ गो:हे यांचा समावेश होता. १ महिन्यात जवळपास २०० गौवंश वरुड तालुक्यात पकडण्यात आले. ताब्यात घेण्यात सर्व जनावरे ही कामधेनू गौरक्षण येथे ठेवण्यात आले.
याप्रकरणी एम.एच.२७ एक्स ६३३२ क्रमांकाच्या मिनिट्रकच्या चालकाविरुध्द कलम २७९ भादंवि सहकलम (११)(१)(डी)(ई)(एफ) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम सहकलम ११९, सहकलम ८३/१७७, ६६/१९२ मोटर वाहन कायद्यान्वये
यामध्ये वरुडचे ठाणेदार मगन मेहते, सहाय्यक पोलिस निरिक्षक संघरक्षक भगत, रविंद्र धानोरकर, शेषराव कोकरे, सचिन भाकरे, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी सहकार्य केले.