मराठी

अग्रिशमन दलाच्या कर्मचा:यांनी चिमुकल्यास दिले जीवदान

खेळता-खेळता पडला होता विहीरीत

  • नागरिकांनी मानलेत आभार

अमरावती प्रतिनिधी/ १३: स्थानिक गाडगेनगरपरिसरातील बनकर हॉस्पिटल जवळील शेगाव नाका रोडवरील  साइतिर्थ अपार्टमेंट विहीरी जवळ दोन लहान मूल खेळत असताना अचानक मनस्व मनीष मानकर वय 4 हा विहिरीत पडला आरडाओरडा झाल्यावर लगेचच त्याचे वडील मनीष मानकर 38 यांनी ही उडी मारली विहिर खुपच अरुंद असल्याने दोघेही कसेबसे काठ धरून स्वत: चा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते शेजारी शुभम मोरे यांनी अग्निशमन ला फोन केला रस्त्यावर शुकशुकाट असल्याने  वाहन चालक पप्पू निभोरकर यांनी 3 मिनिटात घटनास्थळी देवदूत हे वाहन पोहचवले व तात्काळ शिडी व दोरी  टाकून दोघांनाही अवघ्या 15 मिनिटात बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला सर्वांनी अग्निशमन रेस्क्यू  टीम चे अभिनंदन केले धन्यवाद व्यक्त केले.
अग्निशमन अधीक्षक अजय पंढरे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक (पप्पू) अभिषेक निभोरकार फायरमन हर्षद दहातोंडे, अमोल साळुंके ,सूरज लोणारे,  कंत्राटी फायरमन जयकुमार वानखडे, शुभम जाधव इत्यादी यांनी अथक परिश्रम घेऊन दोघांचे ही प्राण वाचविले

Related Articles

Back to top button