मराठी

कच्च्या तेलाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता

रियाध/ दि ३० –  जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांच्या समूहाच्या (ओपेक) बैठकीपूर्वी तेलाच्या किंमती खाली आल्या. वास्तविक, गुंतवणूकदार कच्च्या तेलामध्ये गुंतवणूक करण्याबाबत सतर्क असतात. ओपेकच्या बैठकीत जागतिक बाजारपेठेतील समतोल राखण्यासाठी तेल उत्पादन कपातीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.
नोव्हेंबर महिन्यात तेलाच्या किंमतींमध्ये चांगली वाढ नोंदली गेली; मात्र सोमवारी किंमतीत दोन टक्के घट झाली. वायदे बाजारानुसार जानेवारीत कच्या तेलाचे दर 1.01 डॉलरने (2.1 टक्के) घसरुन 47.17 डॉलर प्रति बॅरलवर आले. दुसरीकडे, अमेरिकेत जानेवारी महिन्यात कच्चे तेल 86 सेंट (1.9 टक्के ) घसरत 44.67 डॉलर प्रति बॅरलवर आला. नोव्हेंबरमध्ये ब्रँड क्रूड फ्यूचर्स आणि डब्ल्यूटीआय क्रूड फ्यूचर्स 20 टक्क्यांहून अधिक वाढले. मेनंतरचा हा सर्वात मोठा मासिक लाभ आहे. कोरोनावरील तीन लसी यशस्वी होण्याची अपेक्षा असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले होते.आहे. त्यातच जगभरात कच्च्या तेलाच्या मागणीतही वाढ झाली होती.
कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेमुळे तेल उत्पादक कंपन्यांनी विस्ताराच्या योजना पुढे ढकलल्या पाहिजेत, अशी अपेक्षा तेल बाजारातील तज्ज्ञ आणि व्यापा-यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे जागतिक इंधन मागणीवर परिणाम झाला आहे. रशियासह तेल उत्पादक देशांच्या गटांना ओपेक आणि इतरांना ओपेक + म्हटले जाते. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत बराच काळ अनिश्चितता राहिल्याने कच्च्या तेलाच्या किंमती एक टक्क्यांपेक्षा जास्त खाली आल्या. ओपेक + च्या बैठकीत उत्पादन कपातीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो.

Related Articles

Back to top button