मराठी

१ महिन्यासाठी लॉकडाऊन सक्तीचे करावे

शिवसेना माजी तालुकाप्रमुखांची जिल्हाधिका:यांकडे मागणी

वरुड/दि. १९ – वरुड व मोर्शी तालुक्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता १४४ लागु करुन १ महिन्यासाठी सक्तीचे लॉकडाऊन करावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना माजी तालुकाप्रमुख भुपेश शर्मा यांनी जिल्हाधिका:यांना सादर केले आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे असे प्रशासनाला सुद्धा माहीत आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रशासन प्रार्दुभावाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे; परंतु त्यानंतरही प्रार्दुभाव वाढत आहे. प्रशासनाने सक्तीचे धोरण अवलंबल्यास हा प्रार्दुभाव कमी होवु शकतो. लॉकडाऊन केल्यामुळे ग्रामीण व शहरातील कोरोनाचा शिरकाव कमी होवु शकतो. त्याकरिता लॉकडाऊन असतांना शहरातील व ग्रामीण भागातील व्यावसायिकांना सुद्धा प्रार्दुभाव रोखण्या संदर्भात कठोर तंबी देण्यात यावी व वरुड-मोर्शी तालुक्यात १ महिन्याकरिता सक्तीचा लॉकडाऊन करण्यात यावा, अशी मागणी भुपेश शर्मा यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button