वरुड/दि.३० – कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना करणा:या शेतक:यांच्या पिकावर किड व बुरशीजन्य रोगाचे आक्रमक झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐनभरात असलेली सोयाबीन पिवळी पडल्याने शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सोयाबिनवर आलेल्या तांबेरा रोगाच्या आक्रमणामुळे शेतकरी धास्तावला आहे.
मागील वर्षी कापसाला मिळालेला भाव, कापूस विक्रीसाठी घेतलेला त्रास तसेच कपाशीवर येणा:या किडरोगाच्या पाश्र्वभूमीवर यावर्षी बहुसंख्य शेतक:यांनी सोयाबीन या पिकाला पसंती दर्शविली होती. मागील वर्षी मोजक्या शेतक:यांनी पेरलेल्या सोयाबिनला चांगले उत्पादन झाल्याने यावर्षी तालुक्यात सोयाबीन पिकाचा पेरा वाढला होता. गेल्या पाच वर्षांपासून सोयाबीन या पिकावर तांबेरा रोगाचे आक्रमण होत असल्याने शेतक:यांनी सोयाबीन या पिकाकडे पाठ फिरविली होती परंतु मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता सोयाबिनचा पेरा वाढलेला होता. परंतु आतापर्यंत हिरवीकंच असलेली सोयाबीन आता पिवळी पडू लागली आहे. सद्य: सोयाबीनचा शेंगा धरण्याच्या कालावधी असून यंदा सोयाबीनचे पिक चांगले राहील, असा अंदाज शेतकरी बांधू लागला असतांनाच तांबेरा या रोगाचे आक्रमक झाले व सोयाबीन पिवळी पडू लागली आहे तसेच काही शेतक:यांच्या सोयाबीनला शेंगाची लागल्या नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोयाबीन पिकासाठी बि-बियाणे, मशागत व आतापर्यंत झालेला हजारोंचा खर्च वाया गेला आहे. सोयाबीन हे ऐन दिवाळीत येणारे पिक असून ते विकून शेतक:यांजवळ येणा:या पैशात दिवाळसण साजरा होतो मात्र आता सोयाबीनच उधवस्त झाल्याने शेतक:यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे बोलले जात आहे. सोयाबीन या पिकवर आलेल्या तांबे:यामुळे शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतक:यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करीत आहे.तालुक्यातील सोयाबीनीचे पीक पिवळे पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून शेतक:यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन काल आमदार देवेंद्र भुयार यांना राजुरा बाजार येथील शेतकरी राहुल श्रीराव, ओंकार बहुरुपी, प्रविण बहुरुपी तालुक्यातील सोयाबिनचे पिक पिवळे पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे त्या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून शेतक:यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीचे निवेदन काल आमदार देवेंद्र भुयार यांना राजुरा बाजार येथील शेतकरी राहुल श्रीराव, ओंकार बहुरुपी, प्रविण बहुरुपी, सचिन आंडे, भागवत बोहरुपी, प्रविण वानखडे यांनी दिले.