मराठी

एक कोटींहून अधिकांच्या गेल्या नोक-या

कोरोना टाळेबंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून गेली

मुंबई/दि.१७ –  कोरोनामुळे लागू कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. या कोरोना कालावधीत लॉकडाऊनमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांच्या गेल्या आहेत. भारतातही एक कोटींहून अधिक लोकांना नोक-यांना मुकावे लागले आहे. कोरोनाकाळात भारतीय उद्योग बंद झाले. काहींनी उत्पादन बंद केले. २५ मार्चपासून सुमारे एक कोटी सात लाख एेंशी हजार लोकांना नोक-या गमावाव्या लागल्या आहेत. वाहतूक, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन, ऑटोमोबाईल आणि ट्रान्सपोर्ट, रिटेल, आयटी आणि स्टार्टअप्स या क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. २००७-२००९ च्या आर्थिक संकटाच्या काळात, सुमारे पन्नास लाख लोकांना नोक-यांवर पाणी सोडावे लागले होते. प्रवास व पर्यटन क्षेत्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. या व्यवसायात आतापर्यंत ५५ लाख रोजगार गमावले गेले आहेत आणि सर्वात मोठे नुकसान ट्रॅव्हल एजंट्स आणि टूर गाईड्सचे झाले आहे. एका अंदाजानुसार सुमारे दोन कोटी लोक लोक प्रवास आणि पर्यटन उद्योगात काम करतात.

मार्चमध्ये टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर देशभरात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याचे आदेश देण्यात आ,ले तेव्हा अंदाजे सत्तर हजार ते एक लाख नोक-या धोक्यात आल्याचा अंदाज आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आतिथ्य क्षेत्रात ३८ लाख लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. विमान कंपन्यांच्या कमाईवर थेट परिणाम झाला आहे. त्याच वेळी, वाहन आणि वाहतूक क्षेत्रात उत्पादन, काम थांबल्यामुळे ब-याच कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखविला. वाहन आणि वाहतूक क्षेत्रात दहा लाख रोजगार आहेत. याशिवाय किरकोळ क्षेत्रातील दोन लाख लोकांच्या नोक-या गेल्या आहेत.. त्याचबरोबर आयटी क्षेत्रातील १ लाख ५० हजार, स्टार्टअपमध्ये १ लाख आणि बीएफएसआयच्या ३० हजार लोकांना नोक-यांना मुकावे लागले आहे.

तज्ज्ञ म्हणतात, की अशी परिस्थिती ३ ते ४ महिने कायम राहणार आहे. तथापि, जेव्हा टाळेबंदी पूर्णतः हटविली जाईल आणि आणि कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होईल, तेव्हाच रोजगार वृद्धी होईल. आर्थिक चक्रही गतीमान होईल.

Related Articles

Back to top button