लुलू ग्रुप काश्मीरमध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्रात येणार
श्रीनगर/दि. ११ – २०२० मध्ये, लुलू ग्रुपने 4२० कोटी रुपयांच्या तांदूळ, डाळी, चहा, काजू, मांस व मांस उत्पादने, स्नॅक्स आणि इतर खाद्यपदार्थांची आयात केली आहे. लुलू समूहाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव यांच्यात भेट झाल्यानंतर अन्न प्रक्रियाचे क्षेत्र गुंतवणुकीसाठी खुले होणार आहे. अबूधाबीतील लुलू ग्रुप जम्मू-काश्मीरमध्ये फूड प्रोसेसिंग अँड लॉजिस्टिक सेंटर सुरू करणार आहे.
जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव (कृषी) नवीन कुमार चौधरी आणि लुलू समूहाचे संस्थापक अध्यक्ष युसुफ अली यांची दुबईत बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. फेब्रुवारीपर्यंत यावर अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. लुलू समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले, की योजना आधीच तयार केली गेली होती; परंतु टाळेबंदीमुळे उशीर झाला. आता परिस्थिती सामान्य असताना ही घोषणा करण्यात आली आहे. जम्मू विभागातील अन्न प्रक्रिया व रसद केंद्रासाठीच्या जागेचे काम पुढील फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की या प्रकल्पात सुरुवातीला पन्नास कोटींची गुंतवणूक केली जाईल. नंतर गुंतवणुकीचे प्रमाण वाढवले जाईल. सुमारे 300 लोकांना रोजगार मिळेल.
लुलू समूहाने गेल्या वर्षी काश्मीरमधून सफरचंद आणि केशर आयात करण्यास सुरुवात केली. या ग्रुपने सुमारे 25 कोटींच्या 400 टन उत्पादनांची आयात केली. नवीन गुंतवणूकीमुळे हळूहळू आयात वाढेल. लुलू ग्रुप भारतातून वर्षाकाठी सुमारे 400 कोटी किमतीची शेती उत्पादने आणि इतर खाद्यपदार्थांची आयात करतो. ही उत्पादने मध्य-पूर्वेच्या बाजारपेठेत पसरलेल्या 19०० हून अधिक हायपर-मार्ट साखळ्यांद्वारे विकली जातात. 2020 मध्ये 420 कोटी उत्पादने आयात झाली. २०२० मध्ये, लुलू ग्रुपने 380० टन तांदूळ, मसूर, चहा, काजू, मांस व मांस उत्पादने, स्नॅक्स आणि इतर खाद्यपदार्थांची आयात केली आहे. ही आयात सुमारे 420 कोटी झाली आहे. जम्मू-काश्मीरचा यात मोठा सहभाग आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या काळात 400 टन काश्मिरी सफरचंद आयात झाले आहेत. संस्थापक अध्यक्ष युसूफ अली यांचे मूळ राज्य केरळमधील कोची येथे लुलू गट सर्वात मोठे मॉल चालविते.