मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी केली महिला शाैचालयाची स्वच्छता
ग्वाल्हेर येथील सरकारी कार्यालयात महिला शाैचालयाची स्वच्छता
प्रतिदिन/दि.१
ग्वाल्हेरः मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याचे आपल्या कामगिरीसाठी सध्या विशेष कौतुक केले जात आहे. याला कारणही तसेच खास आहे. या मंत्र्याने स्वतः टॉयलेटची सफाई केली आहे. ग्वाल्हेर येथील सरकारी कार्यालयात पोहचलेले राज्याचे उर्जामंत्री प्रद्युमन सिंह तोमर तेथील घाण बघून एवढे भडकले, की त्यांनी स्वतःच टॉयलेटची सफाई करण्याचा निर्णय घेतला.
तोमर हे ग्वाल्हेर येथे विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी आले होते. या वेळी तेथील कार्यालयातील काही महिलांनी टॉयलेटची नियमित साफ-सफाई केली जात नाही. टॉयलेट अस्वच्छ असल्याने त्यांना समस्येचा सामना करावा लागतो, अशा तक्रारी केल्या. महिलांच्या तक्रारीनंतर तोमर यांनी स्वतः त्या परिसरातील टॉयलेटची पाहणी केली. टॉयटेल घाण आढळल्यानंतर त्यांनी स्वतः साफ-सफाई करण्यास सुरुवात केली.
तोमर कर्मचाऱ्यांना म्हणाले, की शासकीय कार्यालय परिसरातील साफ-सफाईची जबाबदारी समजून घ्या व स्वच्छता ठेवा. याशिवाय साफ-सफाईसाठी जबाबदार असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.