मराठी

महानुभाव आश्रमाचे महंत एकोबासबाबा यांचे निधन

उद्या होणार अंत्यसंस्कार

नांदगांव पेठ/दि. ३ –  स्थानिक बाळापूरे ले आउट येथील महानुभाव आश्रमाचे महंत एकोबासबाबा यांचे शनिवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. अचानक भुरळ आल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. आश्रमाच्या सेवेकरांनी त्यांना गावातील एका खासगी रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी कठोरा गांधी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

      सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आश्रमातील सेवेकरांनी त्यांना गावातील खासगी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याने त्यांना अमरावती येथे घेऊन जात असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली.येथील महानुभाव आश्रम उभारणी मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.लॉकडाऊन मध्ये गोरगरीब लोकांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली होती. समाजकार्यात सदा अग्रेसर असणारे एकोबासबाबा यांच्या अचानक जाण्याने महानुभावपंथीय तसेच गावकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
       रविवारी सकाळी कठोरा गांधी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून सध्या दर्शनासाठी त्यांचा देह महानुभाव आश्रम येथे ठेवण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button