अमरावती/दि.३० – दरवषी हा मंडळ गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात,
परंतु या वर्षी कोविड १९ चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हे कार्यक्रम घेता येत नसल्याने आम्ही यावर्षी गणेश उत्सव अंत्यत साध्या सोप्या पद्धतीने व सोसल डिस्टन्स सारख्या शासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या नियमांचे पालन करीत, यंदा आम्ही हा गणेश उत्सव साजरा करीत आहे.
दरवषी आम्ही गणेश विसर्जन मोठ्या थाटात व उत्सवाने साजरा करत असतो,त्यामध्ये ढोल ताशे, ढोल-ताशा पथक, डि जे, आखाडा प्रात्यक्षिके, दिंडी, बेन्जो पार्टी, लेझीम पथक, आदिवासी नृत्य, अशा अनेक पथक वादन करित आम्ही शहरातुन मोठ्या उत्साहात आंनदात जल्लोषात मिरवणूक काढली जाते, परंतु यावेळी असे काही ही करता येणार नाही.
कोरोना संसर्ग असल्यामुळे आम्ही यंदा गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचा सामाजिक उपक्रम राबवत नाही आहे. आणि यंदा गणेश विसर्जन आम्ही शासन प्रशासनाचे नियमांचे पालन करीत आम्ही कमी नागरिकांनच्या उपस्थिती गणेश विसर्जन करणार आहेत. व शासनाला सहकार्य करणार आहे.