मराठी

अलमट्टीवरून महाराष्ट्र-कर्नाटकात वाद

उंची वाढवण्यासाठी कर्नाटक आग्रही, तर महाराष्ट्राचा विरोध

सांगली/दि. २६ – उत्तर कर्नाटकसाठी(Karnataka) वरदान ठरलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांची भेट घेणार असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी दिली. या धरणाची उंची वाढवण्यासाठी महाराष्ट्राने यापूर्वीच विरोध दर्शवला आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने उंची वाढवण्यास परवानगी दिलेली नाही. यानंतरही कर्नाटक सरकारकडून अलमट्टीची उंची वाढवण्याचा घाट घातला जात असल्याने यावरून पुन्हा दोन्ही राज्यात वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगलीपासून १३४ किलोमीटर अंतरावर कर्नाटकातील विजापूर आणि बागलकोट या दोन जिल्ह्यात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. या धरणाचे काम २००५ मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्याचवर्षी महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागला. यानंतर सातत्याने दक्षिण महाराष्ट्रातील पुराचा ठपका अलमट्टी धरणावर ठेवला जात आहे. सध्या धरणाच्या qभतीची उंची ५१९ मीटर आहे, तर १२३ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढवण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू आहेत; मात्र उंची वाढवल्याने याचा मोठा फटका सांगलीपर्यंतच्या गावांना बसू शकतो. याशिवाय पावसाळ्यात गंभीर पूरस्थिती उद्भवू शकते, असा काही तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अलमट्टीच्या उंचीला विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही उंची वाढवण्यास परवानगी दिलेली नाही.

महाराष्ट्राच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा कर्नाटक सरकारकडून अलमट्टीची उंची वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अपवादात्मक परिस्थितीतच गंभीर पुराचा धोका उद्भवू शकतो. अन्यवेळी हे धरण अतिशय उपयुक्त असल्याने उंची वाढवणे गरजेचे असल्याचे मत येदियुरप्पा यांनी जलपूजन प्रसंगी क्त केले; मात्र पाच मीटर उंची वाढवल्याने तब्बल ७७ टीएमसीने पाणी क्षमता वाढणार आहे. या पाण्यामुळे नदीकाठावरील हजारो गावांना जलसमाधी मिळेल. धरणातील फुगवट्याच्या पाण्याचा परिणाम सांगलीपर्यंत जाणवेल. पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

Related Articles

Back to top button