मराठी
महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ञ संघटना महा आय. ए. पी. च्या बुलेटीन चे प्रकाशन संपन्न….!
अमरावती दिनांक 15 :- महाराष्ट्र राज्य बाल रोग तज्ञ संघटनेचे बुलेटीन “परिसस्पर्श “ च्या तृतीय अंकाचे प्रकाशन बालरोग तज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बकुल पारीख यांच्या हस्ते व राज्य अध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झूम मीटिंग द्वारे दिनांक 15 ऑगस्ट रोजी संपन्न झाले.
सध्याच्या करोना च्या संकटकाळी, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील बालरोग तज्ञांनी आपले बाल रुग्णसेवेचे काम नियमीत सुरू ठेवले आहे . संघटनेचे यावर्षीचे घोषवाक्य “Touch to transform” असे आहे. नुकत्याच जन्मलेल्या चिमुकल्या नवजात शिशु पासून ते तारुण्यात पदार्पण करणार्या किशोरवयीन बालकांना आपल्या परिसस्पर्शाने समृद्ध करणाऱ्या बाल रोग तज्ञ यांच्या बुलेटीन चे नावही परीसस्पर्श असे समर्पक आहे. बुलेटीन चे मुख्य संपादक अमरावती येथील डॉ. संदीप दानखडे व सहसंपादक नाशिक येथील डॉ. सदाचार उजळंबकर आहेत.
” परीसस्पर्श ” या बुलेटीन च्या तिसऱ्या आवृत्तीत बालरोगतज्ञ संघटनेच्या राज्य शाखेच्या विविध कार्यक्रम व प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय संघटनेच्या विविध जिल्हा शाखांद्वारे केल्या गेलेल्या अनेक कार्यक्रम व प्रकल्पाचा अहवाल छायाचित्रांसह प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, रायगड, नागपूर, अमरावती इ. शाखांचे कार्यक्रम व प्रकल्प प्रामुख्याने प्रकाशित करण्यात आलेले आहेत. याशिवाय सिकल सेल आजार, करोना चे दिवसांमध्ये लसीकरण, करोना निदान विषयक तपासणी संबंधी नवीन मार्गदर्शक सूचना इत्यादी बालरोग शास्त्र संबंधी शास्त्रीय लेखा शिवाय मराठी साहित्यिक लेख व कविता सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
सदर प्रकाशन समारंभाला बालरोग तज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष – डॉ. बकुल परेख व सौ. पारेख, राष्ट्रीय सचिव- डॉक्टर बसवराज, पश्चिम विभाग राष्ट्रीय उपाध्यक्ष- डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष- डॉ. जयंत पांढरीकर, उपाध्यक्ष- डॉ. राजेश बुब, सचिव- डॉ. सदाचार उजळंबकर, कोषाध्यक्ष- डॉ. अमोल पवार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य – डॉ. महेश मोहिते, डॉ. जयंत जोशी तसेच राज्य कार्यकारणी सदस्य- डॉ. हेमंत गंगोलीया, डॉ. विनायक पाटील, तसेच डॉ. उपेंद्र किंजवडेकर, डॉ. प्रमोद वानखेडे, डॉ चांदूरकर, डॉ जय भांडारकर, डॉ सुनीता इंगळे, डॉ शिल्पा आरोस्कर, डॉ रेणू बोराळकर तसेच राज्यभरातून व देशभरातून अनेक बालरोगतज्ञ यांनी झूम मीटिंग द्वारे उपस्थिती दर्शवली.