मराठी

पालघर हत्याकांडप्रकरणीही महाराष्ट्राची कानउघाडणी

त्यांच्या हातात लाठ्या, काठ्या, कोयते आणि कुराडी होत्या

नवी दिल्ली/ दि. ६ – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणानंतर आता सर्वोच्च न्यायलयाने दुस-याच दिवशी पालघर लिंचिंग प्रकरणी महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. ‘चूक करणाèया पोलिसांवर तुम्ही कोणती कारवाई केली ?, असा सवाल करत सर्वोच्च न्यायलयाने महाराष्ट्र सरकारची कानउघाडणी केली. पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडqचचले गावात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक नीलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे गुजरातकडे चालले होते; पण गुजरातची सीमा बंद असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे ही गाडी मागे आली. गाडी जशी मागे आली, तेव्हा तिथे अचानक लोक जमा झाले. जवळपास हजार लोक होते. त्यांच्या हातात लाठ्या, काठ्या, कोयते आणि कुराडी होत्या. काही कळायच्या आत लोकांनी या तिघांना मारहाण सुरू केली. १६ एप्रिल रोजी घडलेल्या हत्याकांडप्रकरणी तीन पोलीस कर्मचायांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी बुधवारी झाली. बिहारमध्ये नोंदवण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये रियाविरुद्ध गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायलयाने महाराष्ट्र सरकारला चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बिहार पोलिसांविरोधात तुम्ही कसे वागले याचे उत्तर द्या, असे खडसावून पोलिसांविरोधात चौकशी अहवाल मागितला आहे. सर्वोच्च न्यायलयाने महाराष्ट्र सरकारला रेकॉर्डवरही आरोपपत्रे आणण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्राचे म्हणणे आहे, की सर्वोच्च न्यायलयाने तपास कसा झाला, याची तपासणी करावी. सर्वोच्च न्यायलयाच्या चौकशीवर समाधानी नसेल, तरच सीबीआय चौकशी, करावी, असे असेही सॉलिसीटर तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायलयात सांगितले आहे. महाराष्ट्र सरकार सर्व आरोपपत्र सर्वोच्च न्यायलयात सादर करण्यास सहमत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button