वरुड/दि. २२ – श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संलग्नित स्थानिक महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाद्वारे ३५ वा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन नुकताच साजरा करण्यात आला.
ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांसाठी खुली होती. या स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील अनेक स्पर्धकांनी ऑनलाईनरित्या सहभाग नोंदविला. विद्याथ्र्यांना पृथ्वीभोवती असणा:या ओझोनथराच्या आवरणाचे महत्व कळावे तसेच विद्याथ्र्यांच्या कल्पना एकमेकांपर्यंत पोहचाव्या व जनजागृती व्हावी या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक बी.एस.सी.भाग ३ ची विद्यार्थीनी मनिषा अंबाडकर, द्वितीय पारितोषिक बी.एस.सी.भाग ३ ची विद्यार्थीनी योगिनी बरगट तर तृतीय पारितोषिक बी.सी.ए.भाग ३ ची विद्यार्थीनी कृतिका चिंचमलातपुरे हिने पटकाविले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.डी.वडते यांच्याकडुन पारितोषिक मिळालेल्या विद्याथ्र्यांचे अभिनंदन करण्यात आले व सहभागी विद्याथ्र्यांचे कौतुक करण्यात आले.
सदर स्पर्धेसाठी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.उमेश चौधरी यांनी संयोजक, सहयोगी प्राध्यापक डॉ.राजेश गणोरकर, सहाय्यक प्रा.डॉ.अतुल वंजारी, वैभव गुल्हाने यांनी आयोजन सचिव तसेच सहाय्यक प्रा.सतीश कोलटके, डॉ.रुपाली तळेगावकर, डॉ.प्रियंका बेलसरे यांनी समन्वयक म्हणुन काम बघितले.