पुणे/दि. ३१ – मॉन्सूनच्या(Monsoon) स्वरुपात गेल्या काही वर्षांत महत्त्वाचे बदल झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. १९०१ नंतर २०२० मध्ये झालेला पाऊस हा सर्वाधिक आहे. २०२० मध्ये झालेल्या पावसाचे प्रमाण चांगले असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असले, तरी मॉन्सूनच्या स्वरुपात मोठे बदल झाले आहेत. काही ठिकाणी महिन्याभरात संपूर्ण हंगामातील पाऊस पडला. देशभरात १९५० पासून पावसाच्या प्रमाणात सातत्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच पावसाचे प्रमाणही विषम झाले आहे. काही वर्ष कमी काळात अतिवृष्टी झाल्याचे दिसून येते. यंदा १९०१ नंतर सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. यंदा पावसाचे प्रमाण वाढले, ही समाधानाची बाब असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. देशभरात ७७१.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. १ जून ते ३० ऑगस्ट या काळात १९०१ नंतर झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. असा पाऊस १९०१ नंतर ११ वेळा झाल्याची नोंद आहे. यंदाचे पाऊसमान चांगले आहे. १९५० नंतर घट होणाèया पाऊसमानात यंदा वाढ झाली आहे. या वर्षात १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली आहे.
१ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनचा हंगाम असतो; मात्र बदललेल्या मॉन्सूनच्या स्वरुपामुळे ऑगस्टपर्यंतच पाऊस पडतो. काही ठिकाणी महिन्याभरात हंगामातील सर्व पाऊस पडतो. गेल्या दशकात १२२ दिवसातील हंगामातील निम्मा पाऊस अवघ्या ४० दिवसांत पडला होता. ७५ टक्के पाऊस ७० दिवसांत आणि ९० टक्के पाऊस ९४.३ दिवसांत झाला. कमी वेळेत सर्वाधिक पाऊस पडत असल्याचे या दशकात दिसून आले आहे. त्यामुळे देशातील मॉन्सूनचा हंगाम लवकर संपत आहे. मॉन्सूनच्या स्वरुपात प्रादेशिक असमतोलही दिसून आला आहे. नवी दिल्लीत ८३ दिवसांतच मॉन्सूनचा हंगाम संपल्याची नोंद आहे. कर्नाटकात अवघ्या ३० दिवसांत मॉन्सूनचा हंगाम संपला.