नवी दिल्ली-किंगफिशरचा उद्योगपती विजय मल्ल्याच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज होणार होती. पण त्याच्या खटल्याची महत्वाचे कागदपत्रे फआीलमधून गायब झाल्याने न्यायालयाने सुनावणी टाळली आहे. न्यायालयाने ही सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढककली आहे. तीन वर्षांपूर्वी मल्याने ही याचिका दाखल केली होती.
2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशांच्या विरोधात जात त्याची संपत्ती कुटुंबियांच्या नावे केली होती. या प्रकरणी माल्ल्याने याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने आपल्याच रजिस्ट्री अधिकाऱ्यांना ही याचिका अद्याप न्यायालयासमोर का आली नाही, असा प्रश्न विचारला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची नावेही विचारली होती. आता या याचिकेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतातील विविध बँकांचे 9 हजार कोटी घेऊन विजय मल्ल्या हा 2 मार्च 2016 मध्ये कोणालाही खबर लागू न देता देशाबाहेर पळाला होता. ब्रिटेनचे पोलीस स्कॉटलंड यार्डने त्याला 18 एप्रिल, 2017 मध्ये अटक केली होती. मात्र, तेथील न्यायालयाने त्याला काही तासांतच जामिनावर सोडले होते. तेथील न्यायालयात मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर सुनावणी सुरु आहे. त्याच्यावर 17 बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे.