मराठी

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

अमरावती महामार्गावरील उमरखेड नजीकची घटना

वरुड/दि.९ – अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बेनोडा (शहीद) पोलिस स्टेशन अंतर्गत येणा:या उमरखेड फाट्यानजीक घडली. या प्रकरणी बेनोडा (शहीद) पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथील रहिवाशी असलेला राजकुमार गोविंदराव खातदेव (४०) हा घटनेच्या दिवशी रात्री ११.३० च्या सुमारास शेंदुरजनाघाट येथून एम.एच.२७ एडी ५९८४ क्रमांकाच्या बजाज प्लाटिना या मोटरसायकलने बेनोडा मार्गे अंबाडा येथे येत असतांना उमरखेड बसस्टॉप जवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत राजकुमार हा गंभिर जखमी झाला. गंभिरावस्थेत त्याला वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
या प्रकरणी बेनोडा (शहीद) पोलिसांनी मृतकाचा भाऊ दिलीप गोविंदराव खातदेव (४९) रा.अंबाडा यांचे फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुध्द भादंवि २७९, ३०४ (अ) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Back to top button