मराठी
मनीषा वाल्मीकि बलात्कार व हत्याकांड दोषींना फाशीच्या मागणीचे निवेदन सादर
धामणगाव (रेल्वे)/ दि. ५ – येथील वाल्मीक मेहतर समाज सकल पंच, आंबेडकरवादी अन्याय निवारण समिती, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, संघटना लहुजी शक्ती संघटना, आदी सामाजिक संघटनांच्या वतीने उत्तर प्रदेशातील मनीषा वाल्मिकी, बलरामपुर व भदोही या तिन्ही प्रकरणी बलात्कार व हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची संयुक्त मागणी करण्यात आली.
सर्वप्रथम नगरपरिषद प्रांगणातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा जयघोष करून व मनीषाच्या गुन्हेगारांना फाशीच्या घोषणा देऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
वाल्मिकी मेहतर समाजाच्या मनीषा वाल्मिकी व इतर हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता वरील संघटनांनी मा.तहसीलदार साहेब धामणगाव (रेल्वे) जिल्हा अमरावती. मार्फत मा.राष्ट्रपती महोदय, भारत सरकार यांना निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी शासकीय नियमाचे व सामाजिक अंतराचे नियम पाळून निवेदन दिले.
उत्तर प्रदेशात वारंवार बलात्कार व हत्या चे प्रकरण घडत असल्याने उ.प्र.सरकारचा जाहीर निषेध करून दोषींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता मागणी करण्यात आली.
उत्तर प्रदेश मध्ये बलात्कार व हत्या घडल्याची अमानवी कृती वारंवार घडत असून शासन व प्रशासन अपराध्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
विशिष्ट जाती व धर्माला जाणीवपूर्वक छळले जात असून गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत आहे.
मनिषा वाल्मिकी सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणा पाठोपाठ बलरामपुर व भदोही घटना मानवतेला काळीमा फासणारी क्रूर घटना असून या संदर्भात खालील मागण्या करण्यात आल्या.
१) हाथरस मनीषा वाल्मिकी,बलरामपुर व भदोही प्रकरणी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करणे.
२) मनीषा वाल्मिकी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना सुरक्षा प्रदान करणे.
३) देशातील दलित अत्याचार व बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात द्वारा तपासणी करून कठोर शिक्षा करणे.
४) भारतीय सर्व स्त्रियांना व मुलींना संरक्षण प्रदान करण्यात यावे.
तसेच संपूर्ण राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे आदींची मागणी या संघटना द्वारा करण्यात आली.
या प्रसंगी मा. दीपक बाबूलाल राठी,मा.राजेंद्र ह. बोरकर,मा.आशिष काळबांडे, मा.दिपक रंगारी,मा.सुरेश वानखडे, मुकुंद रंगारी, मा.सत्यनारायण सूर्यवंशी, अशोक मोहोड़, संतोष जाटव, मा.रंजीत पोटफोडे,मा.प्रशांत मुन,विनोद तावरे मा.शिलानंद झामरे,बाळू कांबळे सचिन मुन, नंदू भेंडे, अक्षय अर्जुने, सुनील पाटिल, अमोल भगत छोटेलाल ,रमेश चावरे ,पवन सागर डागोर,समरीत राजू,लक्ष्मी चावरे, सुषमा जावे, राजेश जावे, रेखा योते, ज्योति पाटिल, रेखा हटवाल यांचे सह इतर सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.