भारतीय जीवन विमा निगम शाखा वरुडचे विमा प्रतिनिधी मनोज बागडे मिलीयन डॉलर राऊंड टेबल २०२१ बहुमान सन्मानित
वरुड प्रतिनिधी ४ नोव्हेंबर – भारतीय जीवन विमा निगम शाखा वरुडचे विमा प्रतिनिधी मनोज शोभा निळकंठराव बागडे यांनी मिलीयन डॉलर राऊंड टेबल २०२१ युएसए चा बहुमान मिळविला.
गत १७ वर्षापासुन विमा प्रतिनिधी म्हणुन वरुड शाखेतंर्गत मनोज बागडे यांनी आंतरराष्ट्रीय एन.डी.आर.टी.२०२१ चा बहुमान ऑक्टोबर २०२० रोजी आपले टार्गेट पुर्ण करुन प्राप्त केला. सद्य: कोरोनाचा सर्वत्र कहर असुन सुद्धा त्यांनी ग्राहकांना पॉलिसी देण्याचे मोलाचे कार्य केले. यामुळे कित्येक ग्राहकांना एल.आय.सी.तर्फे मृत्युदावा भुगतान सुद्धा करण्यात आले. त्यांनी हा बहुमान प्राप्त केल्यामुळे अमरावती विभागीय प्रबंधक सुजय दत्त, वरुडचे शाखा प्रबंधक सारंग गावंडे, उपशाखा प्रबंधक सुधीर निमजे, सेवा निवृत्त विकास अधिकारी वाळके, विमा प्रतिनिधी उमेश उमक, अनिल बरधे, संदीप वानखडे, मिलिंद मालपे, शरद धोटे, तुषार मानकर, मित्र परिवार सचिन खत्री, दिनेश दुपारे, देवा शेटिये, मनोज आमरकर, प्रमोद थोरात, मनोहर आजनकर, रवि लखपती, डॉ.प्रमोद शेंडे, सुरेंद्र बागडे, पुण्यवर्धन राऊत, निळकंठ रत्नपारखी, राकेश खंडेलवाल, भाऊराव हरले, गुरुवर्धन हुरमाडे, गजानन बागडे, सागर जयस्वाल, दिपक दुपारे, प्रकाश महात्मे, भारत रेवतकर, डॉ.अरविंद भागवतकर, अजय भागवतकर यांचे कडुन मनोज शोभा निळकंठराव बागडे यांनी हा बहुमान मिळविल्याबद्दल सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.