प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६६ हजार अर्ज मनपास प्राप्त
अमरावती प्रतिनिधी/ ९ ऑगस्ट – मनपाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामकाजाचा महापौरांकडुन नुकताच आढावा घेण्यात आला. त्यामध्ये महानगरपालिकाक्षेत्रांतर्गत ६६८८० लोकांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती संबधित विभागाकडुन देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक क्रमांक १ साधन संपत्ती म्हणून वापर करून त्यावरील जमिनीचा झोपडपट्ट्यांचा आहे तिथेच पुनविकास करणे, या योजनेअंतर्गत ३१ जुलै पर्यंत मनपाकडे १५६६९ अर्ज प्राप्त झाले आहे. घटक क्रमांक २ कर्ज सलंग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाèया घराची निर्मिती करणे या योजनेअंतर्गत मनपाकडे ४६२६ इतके अर्ज प्राप्त झाले आहे. घटक क्रमांक ३ खाजगी भागीदारीव्दारे पडवाडनार्या घटरांची निर्मिती करणे, या योजनेअंतर्गत २००५९ एवढे अर्ज महनपाकडे प्राप्त झाले आहे. घटक क्रमांक ४ आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभाथ्र्यांव्दारे वैयक्तीक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान या योजनेअंतर्गत २६५२६ इतके अर्ज मनपाकडे प्राप्त झाले आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने प्राप्त एकुण अर्ज संख्या ६६८८० इतकी असल्याची माहिती प्रधानमंत्री आवास योतनेचे उपअभियंता सुनिल चौधरी यांच्याकडुन महापौरांना देण्यात आली. घटक क्रमांक ९ जमिनीच्या संपत्तीचा साधपसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्ट्यांचा आहे. तेथेच पुर्णविकास करणे या घटकात विकासकाकडून उभ्या इमारती बांधून अतिक्रमणधारकास पुर्नस्थापित करण्यात येणार आहे. परंतु अमरावती मनपा हद्दीत सर्वेक्षणअंती असे निदर्शनास आले की, झज्ञेपडपट्ट्यांमध्ये विविध योजनेअंतर्गत अगोदरच रस्ते, नाली, वीज, सभागृह आदि सुविधा पुरविण्यात आल्या आहे. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१९ अन्वये शासकीय जमिनीवर वर्ष २०११ पुर्वी निवासी प्रयेजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करून प्रथम टप्प्यात कच्चे घर असलेल्या अतिक्रमणधारकास, आहे त्याच जागेवरच नियमाकुल करून भोगवटदार २ अन्वये पट्टा वाटप करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ द्यावयाचा आहे.
झोपडपट्ट्यांचे सव्र्हेक्षण पुर्ण याकरीता अमरावती मनपा हद्दीत शासकीय जागेवर निवासी प्रयोजनार्थ केलेल्या अतिक्रमण धारकांचा झोपडपट्टीनिहाय सव्र्हेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये झोपट्ट्यांचे प्रत्यक्ष कार्य विवरण शासकीय जोवरील झोपडपट्ट्या व झोपडपट्ट्यांची संख्या १०७ आहे. पट्टे वाटपाकरीता सर्वेक्षण पुर्ण झालेल्या झोपडपट्ट्यांची संख्या ५० इतकी आहे. नकाशांना प्रमाणित करण्याकरीता उपअधिक्षक कार्यालयास सादर व झोपडपट्ट्यांची संख्या ४८ इतकी आहे. पट्टे वाटपाकरीता जिल्हाधिकारी कार्यालय समितीच्या मंजुरीकरीता पाठविण्यात आले. त्यामध्ये हनुमाननगर, चमन नगर ,लालखडी, चपराशीपुरा, सदगुरूनगर, व्यंकय्यापुरा अशा ६ झोपडपट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.