मराठी

 विवाह संघर्ष कृती समितीच्या निवेदनाची आ. सुलभाताई कडून दखल  

मंगलकार्यालय, लॉन सुरु करण्यासाठी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र

अमरावती २८ ऑगस्ट :   कोरोना च्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाउन (Lockdown)  व अनलॉक काळात लॉन , मंगलकार्यालय बंद करण्यात आली . दरम्यान लग्न समारंभ साधेपणानेच घरगुती पद्धतीने आटोपण्यात आले . त्यामुळे लॉन ,मंगलकार्यालय हे गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्याने या व्यवसायाबरोबरच याच्याशी निगडित बिछायत , डेकोरेशन ,कॅटरिंग , फोटोग्राफी , साउंड सिस्टीम , इव्हेंट मॅनेजमेंट , वाजंत्री  या घटकांवर  उपासमारीची वेळ आली आहे . शासनाने विवाह समारंभाकरीत ५० लोकांची परवानगी दिली आहे . परंतु एवढ्या लोकांसाठी लॉन  किंवा मंगल कार्यालय बुकिंग केले जात नाही , त्यामुळे किमान ५०० लोकांना सहभागी होण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी लॉन ,मंगलकार्यालय संचालकांच्या  विवाह संघर्ष कृती समिती चे अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके (Mrs. Sulbhatai Khodke, MLA of Amravati) यांना निवेदन देऊन आपली कैफियत व्यक्त केली . सद्यस्थितीत लॉन व मंगलकार्यालयाचा व्यवसाय ठप्प झाल्याने  ते नैराशेच्या गर्तेत अडकले आहेत .  अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी या विवनचनेतून आत्मघातकी पाऊल  सुद्धा उचलले आहे . त्यामुळे  अनलॉक ४ मध्ये लॉन ,मंगलकार्यालयांना सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी , तसेच या वर्षी लग्नकार्याच्या हंगाम / सीजन मध्ये कुठलेही कामकाज झाले नसल्याने आर्थिक मिळकत पूर्णतः बंद आहे , हि बाब लक्षात घेता या व्यवसायाशी निगडित दुकाने , गोडाऊन , मंगलकार्यालय ,लॉन , यांचे महानगर पालिकेचे कर  व विद्युत देयके माफ करण्यात यावे , या सोबतच बहुतांश व्यावसायिक वित्तीय कर्जदार असल्याने त्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत करण्यात यावी व त्यांचे बँकेचे व्याज माफ करण्यात यावे . अशा विविध मागण्या  विवाह संघर्ष कृती समिती , अमरावती च्या वतीने करण्यात आल्या . या मागण्यांना गंभीरतेने घेऊन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी अनलॉक ४ मध्ये  मंगलकार्यालय, लॉन सुरु करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Chief Minister Uddhavji Thackeray) , उपमुख्यमंत्री तथा  वित्त मंत्री अजितदादा पवार(Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar) ,तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (State Revenue Minister Balasaheb Thorat) यांना प्रत्र पाठविले आहे. .
एकंदरीत या मागण्यांचा विचार केल्यास १ सप्टेंबर पासून घोषित होणाऱ्या  अनलॉक ४ मध्ये या आस्थापनांना  परवानगी मिळाली तर  लॉन ,मंगलकार्यालय या व्यवसायाशी निगडित घटकांना फार मोठा दिलासा मिळण्यासह त्यांच्या उदरनिर्वाह करीता  हि बाब फलदायी ठरेल . या बाबत जर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास त्यांना आगामी नोव्हेंबर – डिसेंबर च्या बुकींग करीता कामकाजासह नियोजन करणे सोयीचे जाईल ,अशी बाबही सुलभाताई खोडके यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिली .  अमरावतीत दोन हजार ते साठ हजार चौरस फुटचे लॉन -मंगलकार्यालय उपलब्ध आहे . त्या सर्वांना जागेच्या चौरस फूट नुसार सामाजिक अंतर ठेऊन  लोकांच्या उपस्थितीबाबत परवानगी दिल्यास लॉन -मंगलकार्यालयाचा व्यवसाय व या व्यवसायाशी संलग्नित घटकांचा व्यवसाय पूर्ववत होऊ शकतो . त्यामुळे  शासनाच्या अनलॉक ४ मध्ये  सोशल डिस्टंसिंगचे पालन , वेळोवेळी निर्जंतुकीकरण , मास्क चा वापर , प्रवेश द्वारावर येण्याऱ्या – जाणाऱ्यांचे थर्मल स्क्रिनींग व सॅनिटायझेशन , नियोजित वेळमर्यादा , सारख्या अटींवर लॉन ,मंगलकार्यालयांचा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी. अशी विनंतीपूर्वक मागणी  आमदार सौ  सुलभाताई खोडके यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री तथा  वित्त मंत्री अजितदादा पवार ,तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना  पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे .

Related Articles

Back to top button