इस्लामाबाद/दि.१३ – पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार जानेवारीपूर्वी घरी जाणार असल्याचे पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी म्हटले आहे. मरियम यांनी इम्रान खान सरकारवर आरोप केले आहेत. जनरल मुशर्रफ सत्तेत असतानाही घेतल्यानंतरही पीएलएम-एनवर अशा प्रकारचे अत्याचार झाले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मी याला सरकार मानतही नाही. हे सरकार सरकार म्हणण्यास पात्र नाही, अशी टीका त्यांनी केली. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा विरोधी पक्ष इम्रान खान यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी करत आंदोलन सुरू करणार आहे. या युतीमध्ये पीएमएल-एनचादेखील समावेश आहे. कायदेशीर आधार नसल्यामुळे हे सरकार म्हणण्याच्या लायकीचे नाही. ‘विरोधी पक्ष युती पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) ही काळाची गरज असल्याचे वर्णन करताना त्या म्हणाल्या, की इम्रान सरकारने जनतेची काळजी घेतली नाही. हे सरकार केवळ स्वतःचाच विचार करते आणि विरोधी नेत्यांना गप्प करते. पीडीएममध्ये एकूण ११ पक्ष आहेत आणि कट्टरपंथी नेते मौलाना फजलूर रहमान या आघाडीचे प्रमुख आहेत. शुक्रवारी गुजराणवाला येथे झालेल्या पहिल्या जाहीर सभेतून या आघाडीने इम्रान सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. मरियम पुढे म्हणाल्या, की हे सरकार घटनात्मक नव्हते qकवा त्याला कोणताही कायदेशीर आधारही नाही. खान यांच्या सराकरला लोकांची काळजी नाही.