मराठी

शेतक-यांच्या आत्महत्या केंन्द्रातील मोदी सरकारचा नरसंहार

शेतकरी नेते किशोर तिवारी यांची टिका

 यवतमाळ/दि.११ – केंद्रीय गृह मंत्रालयाने एनसीआरबीच्या माध्यमातून देशात सन 2019 मध्ये दहा हजार पेक्षाही जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्याची पुष्टी केली आहे. यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागातील आहे. महाराष्ट्रातील या भागात तीन हजार पेक्षाही जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून कापूस, सोयाबिन तसेच तुर पिकाची शेती करणारे हे शेतकरी आहे. या कर्जबाजारी झालेल्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करणा-या शेतक-यांच्या आत्महत्या केंन्द्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झाल्या असून मोदी सरकारने केलेला हा नरसंहार असल्याची टिका वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष तसेच शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
किशोर तिवारी यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर कडक टीका केली आणि म्हटले आहे की यावर्षी निश्चित 13 लाख कोटी कृषी कर्जापैकी केवळ 30 टक्के पीक कर्ज वाटप केले गेले आहे. घोषीत झालेली एमएसपी उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी आहे. सरकारचे आयात धोरण कापूस, सोयाबिन, तुर उत्पादक शेतक-यांसाठी धोक्याचे ठरत आहे.  सरकार कृषी क्षेत्रात केवळ दोन-चार परदेशी कंपन्यांचे साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री मोदी हे सर्व नोकरशहांच्या हातचे खेळणे बनले आहे. अशी कठीन परीस्थिती असतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच किसान संघ मुकदर्शन बनले असून हा देशातील शेतक-यांसोबत धोका आहे. आज निष्पाप शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या करीत आहेत. उद्या महागाईमुळे भारतातील 138 कोटी नागरीकांवर उपासमारीची वेळ आल्यास जबाबदार कोण राहील असा प्रश्न सुध्दा किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत शेतक-यांना वेळेत पूर्ण पीक कर्ज मिळत नाही, उत्पादन खर्चाच्या अनुसार आधारभूत किंमत तसेच उत्पन्नाची वेळेत खरेदी व्यवस्था केल्या जात नाही तो पर्यन्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविणार नाही, तसेच शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणे दिवास्वप्न ठरेल, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. सन 2014 मध्ये किशोर तिवारी हे भाजप सरकारमधील मोदीजींच्या जवळ होते. पीक कर्ज धोरण, किंमत निर्धारण, भारतातील डाळींच्या तेलाच्या उत्पादनाची आयात आणि कल्याणकारी शेतकर्यांच्या समस्यांचे समाधान होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेशी जवळीक केली. आता पुन्हा शेतकरी चळवळीत सक्रीय होण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button