महापौर चेतन गावंडे यांनी घेतली मनपा क्षेत्रातील विकास कामाबाबत बैठक
माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
-
लवकरात लवकर निधी महापालिकेला वळती करण्याच्या सुचना
अमरावती दि २९-महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेत महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामाबाबत बैठक आज दिनांक 29 ऑक्टोंबर,2020 रोजी दुपारी 4.00 वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामाबाबत माहिती व सविस्तर चर्चा करण्यात आली. तत्कालीन मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या पुढाकाराने मंजुर करण्यात आलेल्या 4 कोटी 25 लक्ष रुपयाच्या निधीच्या विकास कामांवर लावण्यात आलेली स्थगिती मा.वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार नुकतीच उठविण्यात आली आहे. त्यामुळे हा निधी महानगरपालिकेकडे वळविण्याची सुचना महापौर चेतन गावंडे यांनी केली असून लवकरच प्रलंबित विकास कामाला सुरुवात होणार आहे.माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी तत्कालीन मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमरावती महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोपी सुविधा उपलब्ध होण्याकरिता जास्तीत जास्त निधीची मागणी केली होती. त्यानुसार 4 कोटी 24 लक्ष रुपयांच्या निधीला मान्यता दिली होती.मात्र नविन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अगोदर मंजुरात झालेल्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी ही स्थगिती उठविण्याबाबत मा.वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार मा.वित्त व नियोजनमंत्री अजितदादा पवार यांनी सुध्दा या विकास कामांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी जी विकास कामे सुचविली त्या सर्व कामांना आता लवकरच सुरुवात होणार आहे. या विकास कामांमध्ये अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधील प्रशांत नगर ते भगतसिंग चौक (फ्रेजरपुरापर्यंत) रस्त्याची कामे करणे, जुनीवस्ती मधील बारीपुरा ते नाल्यापर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे, जुनीवस्ती बडनेरा येथे सुरु असलेल्या बगिचा तयार करणे, समर्थ शाळा ते रविनगर चौक रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे, म्हाडा कॉलनी (साईनगर) येथील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश आहे. सोबतच बडनेरा भागात सुरक्षेकरीता सीसीटिव्ही कॅमेरे बसविणेबाबत तांत्रिक मंजूरीची प्रक्रीया सुरु आहे. तरी प्रशासकीय मान्यतेनुसार 4 कोटी 24 लक्ष 53 हजार 918 रुपयाचा निधी अमरावती महानगरपालिकेस उपलब्ध करुन देण्यात यावा विनंती महापालिका प्रशासनाकडुन जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.या बैठकीत विधी समिती सभापती प्रणित सोनी, उपआयुक्त सुरेश पाटील, मुख्यलेखाधिकारी हेमंत ठाकरे, सहाय्यक आयुक्त अमित डेंगरे, कार्यकारी अभियंता 2 सुहास चव्हाण, उद्यान अधिक्षक मुकुंद राऊत, उपअभियंता श्रीरंग तायडे, प्रमोद कुळकर्णी, अभियंता नंदकिशोर तिखिले, दिपक खडेकार, विवेक देशमुख, अजय विंचुरकर उपस्थित होते.