मराठी

महापौर चेतन गावंडे यांनी केली अप्‍पर वर्धा धरण व जलशुध्‍दीकरण केंद्राची पाहणी

उपमहापौर कुसुम साहु, स्‍थायी समिती सभापती राधा कुरील, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, नगरसेवक प्रकाश बनसोड, तुषार भारतीय यांची उपस्थिती

  • 1 मार्च पासुन दररोज पाणी पुरवठा करावा

अमरावती दि १२ – महापौर चेतन गावंडे यांनी आज दिनांक 12 जानेवारी,2021 रोजी अप्‍पर वर्धा धरण व जलशुध्‍दीकरण केंद्राची पाहणी केली. पाहणी दरम्‍यान उपमहापौर कुसुम साहु, स्‍थायी समिती सभापती राधा कुरील, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, नगरसेवक प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, शहर अभियंता रविंद्र पवार, महाराष्‍ट्र जिवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, कार्यकारी अभियंता 2 सुहास चव्‍हाण, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, महाराष्‍ट्र जिवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता निवृत्‍ती रकनाडे, वसंतराव मस्‍करे, सहाय्यक अभियंता मनोज वाकेकर, उपविभागीय अभियंता यांत्रिकी पल्‍लवी पडोळे, उपअभियंता श्‍यामकांत टोपरे, सहाय्यक अभियंता सुधीर गोटे, राजु कुरील उपस्थित होते. पाहणी दरम्‍यान महापौर चेतन गावंडे यांनी अप्‍पर वर्धा धरण व जलशुध्‍दीकरण केंद्राची माहिती जाणून घेतली. यावेळी अप्‍पर वर्धा धरण व जलशुध्‍दीकरण केंद्र या संदर्भात संबंधीतांशी सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली व समस्‍या जाणून घेतल्‍या. महापौरांनी यावेळी सांगितले की, दररोज 1 मार्च पासुन पाणी पुरवठा करावा त्‍यासाठी संपुर्ण नियोजन करण्‍याचे निर्देश दिले. कंत्राटदार काम पुर्ण करत नसल्‍यामुळे सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्‍याची कार्यवाही करण्‍याच्‍या सुचना यावेळी महापौरांनी दिल्‍या. सदर काम हे अतिशय महत्‍त्‍वाचे असून ते त्‍वरीत पूर्ण करावे असे यावेळी त्‍यांनी सांगितले. येणा-या अडचणी त्‍वरीत सोडवून सदर काम पूर्णत्वास  न्‍यावे. सदर कामाची गती आहे त्‍यापेक्षा अधिक करुन नागरीकांना दिलासा द्यावा असे यावेळी त्‍यांनी सांगितले.
महाराष्‍ट्र जिवन प्राधिकरण जलव्‍यवस्‍थापन विभाग अमरावती अमृत केंद्र शासन पुरस्‍कृत अमृत योजने अंतर्गत अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेची संपुर्ण माहिती यावेळी कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी दिली. त्‍यांनी यावेळी सांगितले की, अस्तित्‍वातील योजनेचा उदभव अप्‍पर वर्धा धरणातील जलसाठ्यामधून होतो. अशुध्‍द पाण्‍याचे आरक्षण 58.मिमि3 प्रती वर्ष असून या योजनेमध्‍ये समाविष्‍ट असलेली लोकसंख्‍या सन 2018, सन 2023, सन 2048 च्‍या अनुषंगाने आहे. अमरावती शहरास सद्याचा पाणी पुरवठा 108 एलपीसीडी आहे तर प्रस्‍तावित 135 एलपीसीडी आहे. अमरावती शहरातील नळ ग्राहकांची संख्‍या सन 2016 मध्‍ये 87000 नळ ग्राहक इतकी होती तर प्रस्‍तावित योजने अंतर्गत अंदाजित नळ ग्राहकांची संख्‍या सन 2023 166653 नळ ग्राहक, सन 2048 346460 नळ ग्राहक ग्राहीत धरण्‍यात आली आहे. योजनेची मंजुर किंमत रु.11494 लक्ष इतकी आहे.
अमृत योजनेअंतर्गत डी.पी.आर.मध्‍ये विविध कामे अंतर्भुत आहेत. सर्वेक्षणासाठी 31 रु. लक्ष, 900 एचपीचे 3 व्हिटी पंप बदलविणे 195.93 रु. लक्ष, मुख्‍य जलकेंद्र सिंभोरा येथे 33 के.व्‍ही.विद्युत पुरवठा 41.16 रु. लक्ष, अस्तित्‍वातील जलशुध्‍दीकरण केंद्राची दुरुस्‍ती 67.32 रु. लक्ष, शुध्‍द पाण्‍याची उर्ध्‍ववाहिनीची दुरुस्‍ती 89.56 रु. लक्ष, फलो मिटर्स 33.64 रु. लक्ष, व्‍हॉल एक्‍युटर्स 144.88 रु. लक्ष, मुख्‍य जलकेंद्र सिंभोरा व जलशुध्‍दीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी संयंत्राचे नुतनीकरण करणे 92.11 रु. लक्ष, जलशुध्‍दीकरण केंद्र पारंपारिक 61 एम.एल.डि. 1095.79 रु. लक्ष, शुध्‍द पाण्‍याच्‍या मुख्‍य गुरुत्‍व वाहिन्‍या (टी/एम) 250 मि.मि. ते 400 मि.मि. डी.आय.के.-7-16.50 किलोमिटर 834.34 रु. लक्ष, वितरण व्‍यवस्‍था अस्तित्‍वातील कालबाह्य नलिका बदलविणे 110 ते 200 मिमि. व्‍यासाच्‍या 260.61 कि.मी. व 250 ते 500 डी.आय.के-7 -2.81 किमी. एकुण 263.42 किमी 3047.36 रु. लक्ष, नवीन वाढीव वस्‍तीमध्‍ये वितरण नलिका टाकणे 110 ते 179 मिमि व्‍यासाच्‍या 251.54 किमी व 250 ते 500 मिमि डी.आय.के-7 -19.11 किमी. एकुण 270.65 किमी 2982.84 रु. लक्ष, सौरऊर्जा प्रकल्‍प 1133 रु. लक्ष एकुण अमृत योजने अंतर्गत 11493.47 रु. लक्ष खर्च करण्‍यात येत आहे.
स्‍थापत्‍य कामाच्‍या निविदेची किंमत रु.833349639, स्विकृत निविदेची किंमत रु.832599624, कंत्राटदाराचे नाव मे.पी.एल. आडके, कंत्राटदार नाशिक, करारनामा क्र.बी-1/515/सन 2016-17, कार्यादेश दिल्‍याचा दिनांक कार्यकारी अभियंता मजीप्रा जव्‍य. वि. अमरावती यांचे कार्या.पक्र.निविदा/5368/दि.10.10.2016, निविदेतील समाविष्‍ट कामे पुर्ण करण्‍याचा कालावधी 24 महिने दिनांक 09.10.2018 पर्यंत होता परंतु सदर कंत्राटदाराने अजुनही पुर्ण काम केले नसल्‍यामुळे महापौरांनी यावेळी नाराजी व्‍यक्‍त केली व कंत्राटदारावर कार्यवाही करण्‍याचे निर्देश दिले.
स्‍थापत्‍य कामांची सद्यस्थितीत यावेळी सांगण्‍यात आली. उर्ध्‍व वाहिनी व गुरुत्‍व वाहिनी वरील एअर व्‍हॉल्‍व 112 पुरवठा पुर्ण करण्‍यात आले असून त्‍यापैकी 100 नग बदलविण्‍यात आले आहे. स्‍लुस व्‍हॉल 112 पुरवठा करण्‍यात आला असून 98 नग बदलविण्‍यात आले आहे. जलशुध्‍दीकरण केंद्र पारंपारिक 61 एम.एल.डि.प्रति दिन क्षमतेचे 84 टक्‍के कामे पुर्ण झालेले आहे. मुख्‍य गुरुत्‍ववाहिनी प्रस्‍तावित जलकुंभापासुन ते अस्तित्‍वातील मुख्‍य गुरुत्‍व वाहिनी पर्यंत (टी/एम) एकुण लांबी 14.70 कि.मी. पैकी 14.50 किमी पाईप लाईन पुर्ण करण्‍यात आली आहे. जमिनीवरील टाक्‍या 2 नग/उंच जलकुंभ 9 नगा पैकी 99 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. मालटेकडी येथील जमिनीवरील पाण्‍याची 40 लक्ष लिटर्स क्षमतेची टाकीचे 98 टक्‍के काम पुर्ण झाले आहे. तपोवन येथील जमिनीवरील पाण्‍याची 10 लक्ष लिटर्स क्षमतेची टाकी पाणी पुरवठा सुरु होवून 100 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे.  नवसारी येथील 20 लक्ष लिटर्स क्षमतेची 21 मिटर उंच टाकी पाणी पुरवठा सुरु होवून 100 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. पार्वतीनगर येथील 20 लक्ष लिटर्स क्षमतेची 21 मिटर उंच टाकी 95 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. नागपुरी गेट येथील 20 लक्ष लिटर्स क्षमतेची 21 मिटर उंच टाकी पाणी पुरवठा सुरु 100 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. खोलापुरी गेट येथील 20 लक्ष लिटर्स क्षमतेची 21 मिटर उंच टाकी पाणी पुरवठा सुरु 100 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. बडनेरा जुनी वस्‍ती येथील 20 लक्ष लिटर्स क्षमतेची 21 मिटर उंच टाकी पाणी पुरवठा सुरु 100 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. बेनोडा ट्रेन्‍च येथील 20 लक्ष लिटर्स क्षमतेची 21 मिटर उंच टाकी 94 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. मजीप्रा येथील 15 लक्ष लिटर्स क्षमतेची 18 मिटर उंच टाकी पाणी पुरवठा सुरु 100 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. रहाटगावं येथील 15 लक्ष लिटर्स क्षमतेची 20 मिटर उंच टाकी पाणी पुरवठा सुरु 100 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. म्‍हाडा येथील 10 लक्ष लिटर्स क्षमतेची 20 मिटर उंच टाकी 98 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. शहरातील जुनी वितरण नलिका बदलविणे एकुण लांबी 239 कि.मी. पैकी 223 कि.मी. पाईप लाईनचे काम पुर्ण झाले आहे. शहरातील नवीन विस्‍तारीत भागात वितरण नलिका बदलविणे एकुण लांबी 232.5 कि.मी. पैकी 211 कि.मी. पाईप लाईनचे काम पुर्ण करण्‍यात आले आहे. अस्तित्‍वातील पाण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या उंच टाक्‍यांना दुरुस्‍ती, रंगरंगोटी व चेनलिंक फेनसिंगचे काम 93 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे.
यांत्रिकी कामांची सद्यस्थितीत अशुध्‍द पाण्‍याची पंपींग मशिनरी 900 अश्‍वशक्‍तीचे 5 नगाचे 98 टक्‍के कामे झालेली आहे. शुध्‍द पाण्‍याची पंपींग मशिनरी 50 अश्‍वशक्‍तीचे 4 नग 97 टक्‍के कामे पुर्ण झाली आहे. जुने 2 सी.एल.एफ. 12 फिल्‍टर ची दुरुस्‍तीचे 97 टक्‍के काम झाले आहे. सर्व 12 फिल्‍टरचे 73 व्‍हॉल्‍व व अॅक्‍टूएटर्ससह बदलण्‍याचे 99 टक्‍के काम झालेले आहे. वायरलेस अँन्‍ड इलेक्‍ट्रीफिकेशन 49 टक्‍के कामे झालेली आहे. अस्तित्‍वातील जलशुध्‍दीकरण केंद्र व हेडवर्क्‍सची दुरुस्‍ती 61 टक्‍के कामे पुर्ण झालेली आहे.
सदर योजनेची भौतिक प्रगती 83 टक्‍के इतकी झाली असून या योजनेवर आतापर्यंत रु.89.66 कोटी निधी उपलब्‍ध असून अमृत योजनेवर रु.77.88 कोटी खर्च झालेला आहे अशी माहिती यावेळी कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी दिली.

Back to top button