मराठी

वैद्यकीय अधिकारी डॉ.सिमा नेताम यांनी घेतली दैनंदिन साफ सफाई बाबत आढावा बैठक 

अमरावती/दि.२२  – दैनंदिन साफ सफाई कामाच्‍या अनुषंगाने आज दिनांक 22 ऑक्‍टोंबर,2020 रोजी अमरावती महानगरपालिकेतील कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीत वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ. सिमा नेताम, स्‍वास्‍थ अधिक्षक अरुण तिजारे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक एस.ए.शेख, पी.जे. गावनेर, कुंदन हडाले, राजु डिक्‍याव, विक्‍की जेधे, सर्व स्‍वास्‍थ निरीक्षक उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.सिमा नेताम यांनी यावेळी सांगितले की, सर्व रहिवासी, व्‍यवसायिक परिसर, शासकीय, निमशासकीय संस्‍था, धार्मिक स्‍थळे इत्‍यादी ठिकाणी निर्माण होणारा सर्व प्रकारचा ओला व सुका कचरा हे मुळता निर्मिती होणा-या जागेवरुन, ओला व सुका वेगवेगळा कचरा संकलीत करणे तसेच सदरचा वर्गीकृत कचरा मनपाने निश्चित केलेले कंटेनरच्‍या ठिकाणी किंवा मनपा सांगेल त्‍या प्रभागातील ठिकाणी, वेगवेगळा जमा करावा तसेच प्रभागातील सर्व रस्‍ते, लहान मोठ्या कच्‍चा व पक्‍क्‍या नाल्‍या, सर्व्हिस गल्‍ल्‍या, सार्वजनिक संडास, मुता-या, कलव्‍हर्ट रोड क्रॉस ड्रेन साफ करणे तसेच रोडचे आजु बाजुचा व नालीवरील गवत काढणे, रोड डिवाडर वरील व त्‍याचे आजुबाजुला असलेला कचरा, गाळ तसेच फुटपाथ वरील कचरा व घाण साफ करुन कंटेनर मध्‍ये टाकणे, लिटरवीन्‍स मधील कचरा काढणे, निघणारा कचरा, गाळ, मलमा इत्‍यादी महानगरपालिका अमरावती क्षेत्रातील कंटेनरमध्‍ये कचरा कुंड्यामध्‍ये आणून टाकणे, मनपाचे विविध बाजार पेठे साफ करणे, सार्वजनिक स्‍थळाच्‍या ठिकाणी होत असलेली अस्‍वच्‍छता साफ करावी, मुख्‍यालय, मनपा दवाखाने मनपा शाळा इत्‍यादी मधील स्‍वच्‍छतेचे कामे, शौचालय व मुत्रालय साफ करावी, नाले, नाल्‍या साफ करणे, डास निर्मुलन मोहीम राबविणे, प्रभागात फवारणीचे व धुवारणीचे काम करावे.
धुवारणी व फवारणी बाबत प्रत्‍येक प्रभागाकरीता लागणारे जंतुनाशक औषधी जसे लिंडेन पावडर, चुना पावडर, ब्लिचींग पावडर, फवारणी व धुवारणी करावी. संपुर्ण प्रभागामध्‍ये सर्व दिवस धुवारणीचे व फवारणीचे कामे करणे बंधनकारक राहिल. त्‍याद्वारे स्‍प्रेईंग करणे फॉगिंग करणे, कच-याचे ठिकाणी लिंडेन पावडर टाकणे, बायोटेकस टाकणे, लिंडेन पावडर टाकणे, मलेरीया ऑईल टाकणे, डास उत्‍पतीचे स्‍थाने त्‍वरीत साफ करणे तसेच डास निर्मुलन मोहीम अंतर्गतची सर्व कामे करणे बंधनकारक राहिल असे निर्देश वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ. सिमा नेताम यांनी दिल्‍या.

Related Articles

Back to top button