मराठी

रोजगारनिर्मितीसाठी जिल्ह्यात ऑनलाईन मेळावे

अधिकाधिक तरुणांना लाभ मिळवून द्यावा -पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. २५ : नोकरीसाठी इच्छूक आणि उद्योजक याच्यामधील दुवा तयार करण्यासाठी महाजॉब्स पोर्टलच्या निर्मितीनंतर ऑनलाईन मेळाव्यातून रोजगार निर्मितीवर शासनाकडून भर देण्यात येत आहे(The government is emphasizing on job creation through online fairs).अमरावती जिल्ह्यातही ३१ ऑगस्टपर्यत ऑनलाइन मेळावे घेण्यात येत असून त्याचा जिल्ह्यातील अधिकधिक तरुणांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे यासाठी महाजॉब्स पोर्टल शासनाने उपलब्ध करून दिले असून त्यामुळे उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास मनुष्यबळ मिळणेही शक्य होणार आहे. महाजॉब्समुळे महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल, अर्ध-कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण झाली आहे. याचबरोबर जिल्हा स्तरावर कंपन्यांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाइन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत.
कोरोना संकटकाळात अनेक अडचणी आल्या तरी त्यावर मात  करून उपाययोजना होत आहेत. विकासाची प्रक्रिया थांबलेली नाही. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक कामांना चालना देण्यात येत आहे.
कौशल्य विकास विभागाकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा २६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. नामवंत उद्योगातील १४५ पदे या मेळाव्यातून भरली जाणार आहेत. सर्वदूर याबाबत माहिती पोहोचवून अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.
पोर्टलवर होते नोंदणी
मेळाव्यात ऑनलाइन पद्धतीने सहभाग मिळविणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवरून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध उपलब्ध पदासाठी सहभाग नोंदवावा. पसंतीक्रम नोंदवताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची निवड करता येईल. पोर्टलला यापूर्वी नोंदणी केलेली नसेल तर उमेदवार म्हणून प्रथम नोंदणी करावी व त्यानंतर प्राप्त होणाऱ्या आयडी व पासवर्ड आधारे सहभाग नोंदवावा, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक प्रफुल्ल शेळके यांनी दिली.
अधिकाधिक उद्योगांच्या समावेशाचा प्रयत्न : जिल्हाधिकारी
ऑनलाईन मेळाव्यात अधिकाधिक उद्योगांच्या समावेशाचा प्रयत्न होत आहे. स्थानिक स्तरावरील उद्योगांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील युवकांनी या मेळाव्याचा लाभ घेऊन नोकरीची संधी मिळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
मेळाव्यात सायन्स हेल्थ केअर प्रा. लि.(Science Health Care Pvt. Ltd.) येथील नर्सिंगची १०, पालेकर बेकरी येथील अकुशल कामगारांची ३० पुरूष उमेदवाराची पदे, प्लास्टी सर्जी इंडस्ट्रीज येथील बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरचे, टॅली अकाऊंटंट एक्सिक्युटिव्हचे, डिजिटल मार्केटिंग प्रतिनिधीचे, लॅब केमिस्टचे, तसेच मटेरिअल परचेस मॅनेजरचे प्रत्येकी एक पद व  ऍग्रोनॉमिस्टची आणि इलेक्ट्रिशियनची दोन पदे उपलब्ध आहेत. अस्पा बॅडसन्स ऑटो प्रा. लि. मध्ये अकुशल कामगारांची १० पदे पुरुष उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. चक्रधर एजन्सीत १५ सेल्स ऑफिसरची पदे या मेळाव्याच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. प्रताप इंडस्ट्री येथे फिटरची १० पुरुष उमेदवारांची, तर औरंगाबाद येथील लक्ष्मी अग्नी प्रा. लि. येथे ५० पुरूष उमेदवार पदांसाठी मागणी आहे. प्रिंटलाईफ सोल्युशन येथे  हार्डवेअर इंजीनीअरची सात पदे व इंजिनिअरची दोन पदे पुरूष उमेदवारांसाठी आणि कॉल को-ओर्डीनेटरची दोन पदे महिला उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. याप्रमाणे सुमारे १४५ पदे ऑनलाईन मेळाव्याच्या माध्यमातून भरली जाणार असून, गरजुंनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button