मराठी

संजय राऊत अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई/दि.२६शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप तर होणार नाही ना? अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. दरम्यान, भाजप मधील नेत्यांनी राजकारणात काहीही शक्य आहे. मात्र, ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने शंकेला वाव असल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट गुप्त नव्हती. सामनाच्या मुलाखती संदर्भात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी तब्बल दोन तास चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे. हॉटेलमध्ये याविषयी कोणालाही न सांगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या.
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेटविषयी कसलीही माहिती नाही. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. राजकीय क्षेत्रात अश्या भेटी होत असतात, त्यात बातमी असते असं नाही. गेली नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं म्हटलं नाही. हे सरकार त्यांच्या अंर्तविरोधामुळे पडणार असं आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

  • या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही -भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असं ट्वीट भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

Related Articles

Back to top button