मराठी
शिक्षण क्षेत्रातील विविध समस्येवर उद्या मंत्रालयात शिक्षणमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक
आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांचे पुढाकाराने शिक्षणक्षेत्रातील समस्येवर होणार चर्चा व निर्णय
अमरावती दि १९ :राज्यातील बऱ्याच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध समस्येवर उद्या शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड यांचे उपस्थीत.सोबतच अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे, पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत व कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांचे उपस्थितीत दि.20 आँक्टोबर 2020 रोजी सकाळी 12:00 वाजता शालेय शिक्षणमंत्री यांचे दालन क्र.303 तिसरा मजला,मंत्रालय मुंबई येथे आयोजित केली आहे.
या बैठकीला आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे,शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, संचालक विद्याप्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे,उपसचिव (प्रशिक्षण) शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, उप सचिव (टिएनटी) शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई व इतरही अधिकारी व शिक्षक आघाडी ,महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती या शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे आमदार श्रीकांत देशपांडे यांचे स्वीय सहाय्यक रविंद्र सोळंके यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.