वरुड/दि.२२ – माहेरुन घर घेण्याकरीता पैशाची मागणी करीत विवाहीतेला मानसिक व शारिरीक त्रास देणा-या पतीसह १० जणांविरुध्द शेंदुरजनाघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, नरखेड तालुक्यातील पांढरी येथील ओमप्रकाश नारनवरे याचेशी २०१८ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. काही दिवसपर्यंंत पतीसह सासरच्यांनी विवाहीतेला चांगली वागणुक दिली परंतु काही दिवसांनी विवाहीतेला तुझ्या वडिलांनी लग्नात काहीही आंदन दिले नाही असे म्हणुन फिर्यादी हिला तुझ्या वडिलांकडून नागपुर येथे घर घेण्यकरीता पैसे आण नाही तर तुला फारकती देतो, असे सांगुन शारिरीक व मानसिक त्रास दिला आणि इतर आरोपी हे सुध्दा ही चांगली नाही, हिला फारकती देवुन टाक नाही तर हिच्या वडिलांकडून घर विकत घेवुन माग असे म्हणुन शारिरीक व मानसिक त्रास देवुन शिविगाळ केली, अशा विवाहितेच्या फिर्यादीवरुन शेंदुरजनाघाट पोलिसांनी पती ओमप्रकाश मोतीराम नारनवरे रा.पांढरी, लिलाबाई मनोहर नारनवरे, मनोहर नारनवरे रा.भोपाल (मध्यप्रदेश), गं.भा.पंचफुलाबाई मंडाळे रा.पिपला, ता.सौसर, जि.छिंदवाडा, जितेंद्र मोतीराम नारनवरे रा.पांढरी, मिलिंद मोतीराम नारनवरे, राजकुमारी मिलिंद मोतीराम नारनवरे दोन्ही रा.नागपुर, सचिन गजभिये, नितीन गजभिये दोन्ही रा.पिपला, ता.सौंसर यांचेविरुध्द ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार श्रीराम गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.