लक्ष्मीविलास बँकेचे विलीनीकरण
मुंबई/दि.१८ – खासगी क्षेत्रातील बँक लक्ष्मी विलास बँक (LVB) मॉरोरियमवर ठेवल्याची बातमी पुन्हा एकदा भारतीय बँकिंग प्रणालीतील उणिवा उघडकीस आली आहे; परंतु रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बचाव अभियान राबविण्यात आले आहे, यावरून रिझर्व्ह बँकेने बँकांना बुडण्यापासून वाचवण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवले हे स्पष्ट झाले. लक्ष्मीविलास बँक ही रिझर्व्ह बँकेने एका वर्षात वाचवलेली तिसरी बँक आहे. ती दिवाळखोरीपासून वाचली.
केंद्र सरकारने लक्ष्मीविलास बँकेला (LVB) तीनशे दिवस स्थगिती दिल्यानंतर काही मिनिटानंतर रिझर्व्ह बँकेने ही बँक डीबीएस बँकेमध्ये (DBS BANK) विलीन करण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मीविलास बँक डीबीएस बँकेत विलीन करण्याची रिझर्व्ह बँकेची योजना आहे. स्थगिती कालावधी संपण्यापूर्वी लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्याचे रिझर्व्ह बँकेचे लक्ष्य आहे. हीच परिस्थिती गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंजाब महाराष्ट्र बँकेची बँकेची होती; परंतु त्या वेळी रिझर्व्ह बँक हे पाऊल उचलू शकली नाही. पंजाब महाराष्ट्र बँकेच्या ठेवीदारांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाही.
एका महिन्यातच डीबीएस बँकेत लक्ष्मीविलास बँक विलीन करण्याची रिझर्व्ह बँकेची योजना आहे. त्यामुळे लक्ष्मी विलास बँकेत पैसे जमा करणा-या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळू शकेल आणि ते सहज त्यांचे पैसे काढू शकतील. तसेच ज्या ठेवीदारांना आपले पैसे बँकेत ठेवायचे आहेत, त्यांचे पैसे देखील सुरक्षित असतील. सध्या, लक्ष्मी विलास बँकेवरील निर्बंधामुळे ठेवीदार केवळ 25 हजार रुपये काढू शकतात. ठेवीदाराला 25 हजार रुपयांहून अधिक रक्कम देण्यासाठी लक्ष्मीविलास बँकेला रिझर्व्ह बँकेची मान्यता घ्यावी लागेल. या विलीनीकरणानंतर, डीबीएस बँक आपले पैसे बँकेत ठेवू इच्छित नसलेल्या ठेवीदारांना सर्व पैसे परत करेल.
ठेवीदारांच्या या विलीनीकरणाचा फायदा बँक कर्मचा-यांनाही होईल. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, की लक्ष्मी विलास बँकेचे कर्मचारी डीबीएस बँकेचे कर्मचारी होतील आणि त्यांना काढून टाकले जाणार नाही; परंतु सर्वांत जास्त नुकसान लक्ष्मी विकास बँकेच्या भागधारकांचे होईल. सध्या या बँकेची नेटवर्थ नकारात्मक आहे. अशा विलीनीकरणात बँकेच्या भागधारकांना पैसे मिळणार नाहीत आणि बँकेचे मूल्य शून्य मानले जाईल.