न जन्मलेल्या मुलाच्या नाभिकेत मायक्रोप्लॅस्किचे कण
लंडन दि २४ – न जन्मलेल्या मुलाच्या नाभीमध्ये मायक्रोप्लॅस्टिक कण सापडले आहेत. संशोधकांचा असा विश्वास आहे, की मायक्रोप्लॅस्टिक कण गर्भाच्या विकासावर परिणाम करू शकतात. अर्भकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे भविष्यात रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता कमी होऊ शकते.
शास्त्रज्ञ म्हणतात, की या मायक्रोप्लॅस्टिक कणांमध्ये पॅलेडियम, क्रोमियम, कॅडमियम यासारख्या विषारी धातू असतात. तथापि, मायक्रोप्लॅस्टिकचा किती प्रमाणात परिणाम होईल, हे अद्याप समजू शकलेले नाही. मुलावरील संशोधन रोममधील फतेबेनेफ्रेटेली हॉस्पिटल आणि पॉलिटेक्निका डेल मार्श विद्यापीठ यांनी केले आहे. संशोधनादरम्यान, असे आढळले, की हे कण गर्भाच्या वाढीस नाभीच्या भागासह पडद्यामध्येदेखील होते. पेंट, पॅकेजिंग आणि कॉस्मेटिकमधील हे कण शरीरात पोहोचतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, नाभीमध्ये डझनभर प्लॅस्टिकचे कण सापडले; परंतु त्यापैकी केवळ चारतपासणी करता आली. हे कण लाल, निळे, केशरी आणि गुलाबी होते, असे तपास अहवालात म्हटले आहे.
पेंट, पॅकेजिंग, कॉस्मेटिक आणि अन्य साधनांतून ते स्त्रियांपर्यंत पोहोचले. येथून नवजात मुलाकडे आले. हे कण अत्यंत सूक्ष्म, रक्तामधून कोठेही जाऊ शकतात. अहवालानुसार, मायक्रोप्लॅस्टिक कणांचे आकार 10 मायक्रॉन होते. ते रक्तामध्ये सामील होऊन ते संपूर्ण शरीरात कुठेही जाऊ शकतात. हे कण मुलापर्यंत पोहोचतात आणि त्यास हानी पोहोचवू शकतात. संशोधक म्हणतात, की गर्भाच्या विकासासाठी नाभीसंबधीची दोरी महत्वाची भूमिका असते.