मराठी

मिल्ग्रोम, विल्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल

स्टॉकहोम/दि. १२ – अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार पॉल आर. मिल्ग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांना घोषित करण्यात आला आहे. लिलावाची तत्त्वे आणि लिलावाच्या नव्या प्रारुपाच्या शोधासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मिल्ग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांची नोबेलासाठी निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एमआयटी आणि हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकांना अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते. त्यावेळी तब्बल ११ लाख अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आला होता. त्यामध्ये भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांचा समावेश होता. तसेच अमत्र्य सेन यांना १९९८ साली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, २०२० च्या वैद्यकीय विभागातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे हार्वे जे अल्टर, चाल्र्स एम राईस आणि ब्रिटिश संशोधक मायकल ह्यूटन यांना देण्यात आला आहे. या तिघांनाही कॅन्सर आणि सिरोसिसला कारणीभूत ठरणाèया हेपेटायसिस सी या विषाणूचा शोध लावण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. भौतिकशास्रातील नोबेल पुरस्कार यंदा तीन शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. रॉजर पेनरोज , रेनहार्ड गेंजेल, एन्ड्रिया गेज या तीन शास्रज्ञांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचे काम रॉजर पेनरोज यांनी केले, तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोन्ही शास्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिविशाल ब्लॅकहोल शोधून काढला. त्यांचे हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचे आहे. त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. रसायनशास्त्रातील (केमिस्ट्री) यंदाचा नोबेल पुरस्कार दोन महिला वैज्ञानिकांना मिळाला आहे. इमानुएल शॉपोंतिये (फ्रान्स) आणि जेनिफर ए डुडना (अमेरिका) असे या संशोधकांचे नाव आहे. त्यांना ‘जीनोम एडिqटग‘ची एक पद्धत विकसित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या शोधानंतर लाईफ सायन्स एका नव्या उंचीवर पोहचणार आहे. त्यामुळे संपूर्ण मानवतेला खूप मोठा फायदा होईल, असे मत नोबेल पुरस्कार समितीने व्यक्त केले आहे.

Related Articles

Back to top button