मराठी

बेपत्ता 136 जणांना बेपत्ता घोषित करणार

डेहराडून/दि. २३ – हिमस्खलन होऊन धरण फुटल्यानेजोशीमठ येथेजी आपत्ती आली, त्यातील सत्तर जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडलेआहेत. 29 जणांचेअवयव सापडलेआहेत. 136 लोक बेपत्ता आहेत. आता राज्य सरकार या सर्व बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्याची तयारी करत आहे. यासाठी लवकरच आदेश काढण्यात येईल. असे झाल्यास या आपत्तीत आपला जीव गमावणा-यांची संख्या 206 पर्यंत वाढू शकते.
राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार चमोली व आसपासच्या भागात सतत शोध सुरू आहे. मोठ्या संख्येने लोकांचे मृतदेह बाहेर काढले गेले आहेत, तर काहींचा बचावही करण्यात आला आहे. असे असूनही, ज्यांच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, त्यांना आता मृत घोषित केलेजाईल. कृषीगंगेवरील तलावाचे रुंदीकरण झालेआहे. चामोलीतील रैनी गावाजवळील कृषीगंगा नदीवर हिमनदीनेतोडून टाकलेल्या कृत्रिम तलावापासून अजूनही मोठा धोका आहे. तलावाच्या छोट्या तोंडामुळेपाण्याचा प्रवाह कमी होत चालला होता. त्यामुळे तलाव फुटण्याचा धोका होता. इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांनी तलावाचेतोंड सुमारे15 फूट रुंद केले आहे. येथे पाणी साचल्यामुळेदबाव वाढत होता. राज्य आपत्ती प्रतिसाद संघाचे(एसडीआरएफ) कमांडंट नवनीत भुल्लर सांगतात की, तलावाचे तोंड रुंदी करण्याचेकाम अजूनही सुरू आहे. आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या टीम या तलावावर सातत्याने नजर ठेवत आहेत.
या तलावामध्ये सुमारे480 दशलक्ष लिटर पाणी आहे. भारतीय नौदल, एअरफोर्सआणि तज्ज्ञ पथकानेकृषी गंगाच्या वरील ग्लेशियर तोडून तयार केलेल्या कृत्रिम तलावाची पाहणीही केली. तलावाची खोली मोजली. या तलावामध्ये अंदाजे 480 दशलक्ष लिटर पाणी आहे. तज्ज्ञांच्या मतेहा तलाव सुमारे750 मीटर लांबीचा असून तो आणखी अरुंद होत आहे. त्याची खोली आठ मीटर आहे. हा तलाव फुटला तर बरेच नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या मतेहे तलाव केदारनाथच्या चौरबाडीसारखेआहे. 2012- 2013 मध्येकेदारनाथच्या वरच्या भागात दोन मीटर लांबीचे, एक मीटर रुंद आणि सुमारे 20 मीटर खोल सरोवर फुटल्यामुळे आपत्ती उद्भवली. या तलावातून दर सेकंदाला सुमारे17 हजार लिटर पाणी बाहेर येत होते. कृषीगंगा नदीत सेन्सर्सही लावण्यात आले आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढताच धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजेल.

Related Articles

Back to top button