मराठी

शेतकर्याना दिवसाला वीज पुरवठा देण्याची आमदार देवेंद्र भुयार यांची मागणी ! 

आमदार देवेंद्र भुयार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोब सकारात्मक चर्चा ! 

  • घरगुती वीज बिलात सूट देऊन शेतकर्याना नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी शेतकर्याच्या व्यथा मांडल्या शासन दरबारी !

वरुड तालुका प्रतिनिधी /२२ – मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांनी वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकर्याच्या व्यथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मांडून शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली आहे. वरुड मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा सुरु केल्याने शेतकरी त्रस्त झाले असून वाघ, बिबट्या, रानडुकरे आदी जंगली प्राणी व तत्सम संकटामुळे हैराण झाला आहे.
वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषिपंप धारकांना सद्यस्थितीत ३ दिवस दिवसा ८ तास व ४ दिवस रात्रीचे वेळी १० तास विज पुरवठा उपलब्ध होत आहे.
वरुड व मोर्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा, मोसंबी इ. फळबागांची लागवड झालेली आहे. या भागातील भुजल पातळी खालावलेली असुन १२०० फुट खोलीपर्यंत बोअरवेलद्वारे पाण्याचा उपसा करुन फळबागा व ईतर पिके जीवंत ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करतात. यावर्षी सरासरी पर्जन्यमान अनुकुल झाल्यामुळे ओलीताकरिता मुबलक
पाणी उपलब्ध आहे.
रात्रीचे वेळी खंडीत झालेला विज पुरवठा सुरळीत करण्याकरिता महावितरण कर्मचारी शेतकऱ्यांना उपलब्ध नसतो. यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असुन सुध्दा शेतकर्याना ओलीत करणे कठीण झालेले आहे. कोरोनाची नैसर्गिक आपत्ती व अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकर्याना सावरण्याकरिता रब्बी हंगाम डोळ्यासमोर ठेवून ओलीत करणे साईचे व्हावे याकरिता दिवसा विज पुरवठा होणे आवश्यक असल्यामुळे महावितरण कंपनीने शेतकर्याना दिवसा १२ तास विज पुरवठा करावा, वरुड, मोर्शी तालुक्यातील जवळपास २५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शेती करीता नवीन विज जोडणी मिळणे करीता अर्ज केले आहेत. परंतू त्यांना मागील काही वर्षापासून अद्यापर्यंत शेतीकरीता विज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकर्याना ओलीताकरीता मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असून संत्रा झाडासह ईतर पिके सुध्दा वाळण्याच्या मार्गावर आहेत.वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये त्याकरीता वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीकरीता तात्काळ नवीन वीज जोडणी देण्यात यावी
 यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेउन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांच्याशी भेट घेऊन वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
मार्च महिन्यापासून भारतासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीने शिरकाव केला होता, या कोरोना रोगाच्या भीतीमुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद होते, खाजगी नोकरदार घरी आले होते, सर्व दुकाने बंद होती, मजुरांना काम मिळत नव्हते त्यामुळे मध्यमवर्गीयावर आर्थिक संकट ओढवले. अशात महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने अनेक ग्राहकांना भरमसाट असे बिल दिले, हे बिल भरणे त्यांना शक्य नव्हते कारण अनेकांना कामच नसल्यामुळे त्यांच्यापुढे पोट भरायचं हा प्रश्न उभा होता आता वीज बिल भरावे कसे ? असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून देऊन नागरिकांना लॉक डाऊन काळातील वीज बिलामध्ये सूट देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली.

Related Articles

Back to top button