मराठी

११ गावातील पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचा पुढाकार

प्रलंबित असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करण्याच्या दिल्या सूचना

वरुड तालुका प्रतिनिधी :- मोर्शी विधानसभा मतदार संघातील विविध गावातील पाणीपुरवठा योजनांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा व महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीला मोर्शी वरुड तालुक्यातील प्रलंबित असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या .
 मोर्शी विधानसभा मतदार संघातील आमनेर, बेनोडा, जरुड, लोणी, पुसला,टेंभुरखेडा,‌ राजुराबाजार, रिद्धपूर, अंबाडा, हिवरखेड, पिंपळखुटा या ११ गावांतील स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांवर १० एच.पी.पर्यंतची मोटर चालविण्यासाठी सोलर पॅनल बसवण्यास त्यातील त्रुटी पूर्ण करण्यासाठी तसेच अनेक गावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भातील विविध प्रश्न मांडून नागरिकांना होत असलेल्या अडचनि तात्काळ सोडविन्याच्या सूचना देण्यात आल्या, तसेच हिवरखेड, अंबाडा, खेड, लोणी, जरूड येथे वीज वितरण कंपनीचे  उपकेंद्रे कृषी ऊर्जा वाहिनी उभारणी करण्यासाठी  बैठकीत चर्चा करण्यात आली.
 आमदार देवेंद्र भुयार यांचे अध्यक्षतेखाली वरुड तालुक्यातील आमनेर, बेनोडा,  जरुड, लोणी, पुसला, टेंभुरखेडा,‌ राजुराबाजार, गव्हाणकुंड व मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर, अंबाडा, हिवरखेड व पिंपळखुटा या गावातील पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर कार्यान्वीत करण्याचे प्रस्तावाची त्रुटी दूरुस्ती करण्यासाठी बैठक घेण्यात आली त्यावेळी  बैठकीला आमदार देवेंद्र भुयार,  वरुड चे तहसीलदार सावंत साहेब, गट विकास अधिकारी कानाटे साहेब, पाणी पुरवठा विभागाचे उप‌अभीयंता देशमुख साहेब, मरावि मं. व  संबंधित गावातील ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह आदी मंडळी यावेळी उपस्थित होती .

Related Articles

Back to top button