मराठी

कोविड रुग्णालयासाठी आमदाराचे प्रयत्न गरजेचे

आक्रमक देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांकडे जनतेचे लक्ष

वरुड/दि.२७ – तालुक्यात वाढते कोविळ रुग्ण व मृत्यू मध्ये होत असलेली भरमसाठ वाढ, यामुळे कोविड रुग्णालय स्थापन करण्याची मागणी जोर धरु लागली असून आ.देवेंद्र भुयार यांनी यासाठी आक्रमक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बोलत असून मतदारांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिल्याने तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत आ.देवेंद्र भुयार यांचेकडे जनतेचे लक्ष लागले आहे
वरुड परिसरात ३०० चे वर रुग्ण व १७ मृत्यू ही शासकीय आकडेवारी आहे परंतु प्रत्यक्षात चाचणी न केलेले ७० चे वर मृत्यू झालेले झाले असून ५०० चे वर संशयित गावभर फिरत आहे. इतकेच नव्हे तर शासकीय नियमानुसार गृह विलागिकरण ठेवलेले रुग्ण अलग न राहता दाढी कटिंग सह आपले सर्व दैनंदिन व्यवहार गावभर फिरुन पूर्ण करीत असतात. त्यामुळे वरुड परिसरात कम्युनिटी स्प्रेड वेगाने वाढत आहे.
परिसरातील सर्व रुग्ण अमरावतीला पाठवावे लागत असल्याने रुग्णाची व नातेवाईकांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होते. इतकेच नव्हे तर स्वत: आ.भुयार हे कोविड रुग्ण होते. प्रथम अमरावती, नागपूर व मुंबई येथे त्यांनी उपचार घेतला परंतु सामान्य नागरिकांचे काय? हा प्रश्न निर्माण होत असून त्यासाठी वरुड तालुक्यातच कोविड रुग्णालयाची मागणी करण्यात आली असून आ.देवेंद्र भुयार हे सरकारचे सहकारी आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख यांचे शासन दरबारी वजन असून पालकमंत्र्यांसोबत चर्चा करुन किमान १०० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी आक्रमक म्हणून ओळख असलेले आ.देवेंद्र भुयार हे संकटकाळी जनतेच्या या मागणीसाठी किती आक्रमक होतात याकडे तालुक्यातील नागरिक लक्ष ठेवून आहे

Related Articles

Back to top button