मराठी

मनसेकडून महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड

वीजबिल कमी करावे अशी मागणी

मुंबई दि. ११ –  भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. वीजबिल कमी करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर आता मनसे कार्यकत्र्यांनी आपल्या स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे. नवी मुंबईतील वाशी सेक्टर १७ मधील महावितरणच्या कार्यालयाची मनसे कार्यकत्र्यांनी तोडफोड केली आहे. कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची कार्यकत्र्यांनी तोडफोड करून वीजबिल दरवाढीचा निषेध केला.

Back to top button