मराठी

प्रामाणिक करदात्यांसाठी आज मोदी करणार महत्त्वाची घोषणा

प्रामाणिक करदात्यांसाठी खास व्यासपीठ लाँच

नवीदिल्ली/दि. १२ – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रामाणिक करदात्यांसाठी खास व्यासपीठ लाँच करणार आहेत. अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या व्यासपीठासंदर्भातील घोषणा केली होती. मोदी गुरुवारी देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी व्यासपीठ लाँच करणार आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘पारदर्शक कर आकारणी-सन्मान‘ हे व्यासपीठ लाँच करणार आहेत. एक फेब्रुवारीला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘करदाता सनद‘ जाहीर करण्यात आली. सरकारने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या व्यासपीठाचा प्रारंभ थेट कर सुधारणेच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. सीतारामण आणि अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूरही या कार्यक्रमात सहभागी होतील.

या व्यतिरिक्त विविध उद्योग मंडळे, व्यापारी संघटना, चार्टर्ड अकाउंट असोसिएशन आणि नामांकित करदात्यांचे प्रतिनिधीही यात सहभागी होतील. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान करदात्यांना ‘राष्ट्र-निर्माता‘ असे संबोधतात. मोदी उद्या व्हिडीओ-कॉन्फरन्सिंगद्वारे पारदर्शक कर – सन्माननीय आदर या व्यासपीठाचा प्रारंभ करणार आहेत. मागील वर्षी कॉर्पोरेट कराचा दर ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त, नवीन उत्पादनाच्या युनिटसाठीचा दर केवळ १५ टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आला. तसेच लाभांश वितरण कर रद्द करण्यात आला. सरकारच्या म्हणण्यानुसार करात सुधारणा करताना मुख्यतः करांचे दर कमी करणे आणि थेट कराशी संबंधित नियम सुलभ करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विभागाचे कामकाज सुधारण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी अलीकडे कित्येक पावले उचलली आहेत. अधिकृत संप्रेषणाबाबत अधिक पारदर्शकता येण्यासाठी विभागाने दस्तावेज ओळख क्रमांक (डीआयएन) आणला आहे. त्याअंतर्गत, विभागाद्वारे जारी केलेल्या प्रत्येक संप्रेषणामध्ये संगणकाद्वारे निर्मित अनन्य ओळख क्रमांक असतो. त्याचप्रमाणे करदात्यांची सोय लक्षात घेता प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर परताव्याची प्रीफिqलग सुरू केली आहे. यामुळे करदात्यांना प्राप्तिकर विवरण भरणे सुलभ करते. स्टार्टअप कंपन्यांसाठी अनुपालन नियम सुलभ केले आहेत.

Related Articles

Back to top button