मराठी

संकटांतून रामजजन्मभूमी मुक्त मोदी यांची भावना

राम मंदिराचे भूमिपूजन

अयोध्या : संकटाच्या चक्रव्यूहातून रामजन्मभूमी मुक्त झाली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला. आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचे निर्माण होईल. तुटणे आणि पुन्हा उभे राहणे यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आजचा दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते पार पडले. या वेळी राम मंदिरावर आधारित नव्या टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. तब्बल पाच लाख टपाल तिकिट छापण्यात येणार आहेत.

या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते. त्यानंतर मोदी म्हणाले, की हे मंदिर सामूहिक शक्तीचे प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाèयांना प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होतील. संपूर्ण जगातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतील. राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे. राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. ज्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे स्वप्न साकार होत आहे, त्या सगळ्यांना मी नमन करतो, वंदन करतो, असे सांगून ते म्हणाले, की ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान आहे. शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला. आज श्रीरामाचा जयघोष केवळ सिया-रामाच्या भूमीतच नाही, तर संपूर्ण जगभरात घुमत आहे. राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळते. अनेक देशातील लोक प्रभू श्रीरामाला मानतात. जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असेल्या इंडोनेशियात रामायण पूजनीय आहे. कंबोडिया, मलेशिया, थायलंड, इराण आणि चीनमध्ये राम कथांची माहिती मिळेल. नेपाळ आणि श्रीलंकेचाही संबंध जोडलेला आहे. अनेक देशांमधील लोकांना राम मंदिराचे काम सुरू झाल्याबद्दल आनंद होत असेल.

भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय असल्याचे मोदी यांनी सांगितले. श्रीरामाचे नाव असलेल्या शिळा देशातील अनेक भागांतून आल्या. त्या एक ऊर्जा निर्माण करत आहेत. या मंदिरासोबत नवा इतिहास रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, असे मोदी या वेळी म्हणाले.

शिवरायांचा संदर्भ मोदी यांनी आपल्या भाषणात शिवरायांचा संदर्भ दिला. ते म्हणाले, की ज्याप्रमाणे मावळे छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचे संरक्षक बनले, तसेच देशातील अनेक लोकांच्या सहयोगाने राममंदिर निर्माणाचे हे पुण्यकार्य पूर्ण होईल.

तीस वर्षांच्या संघर्षाचे फळ . हा आनंदाचा क्षण आहे, एक संकल्प केला होता, तो आज पूर्ण झाला आहे, याचा आनंद आहे. इथे मंदिर बनणार आहे; मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचे निर्माण करावे लागणार आहे. मंदिर पूर्ण होण्याआधी आपल्याला आपले मनमंदिर उभे करायचे आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. आत्मनिर्भर बनण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता होती, त्याची सुरुवात आज झाली आहे. गेल्या ३० वर्षांच्या कठीण संघर्षाचे फळ आज मिळाले आहे. एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button