मराठी

अप्पर वर्धा धरणात ५० टक्क्याहुन अधिक पाणी

मागच्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील मोठे, लघू, मध्यम जलाशयात ७०.६८ टक्के पाणी

अमरावती  प्रतिनिधी/ ९ ऑगस्ट – यंदा पावसाळ्यात मुसळधार पाऊस खूप कमी झाला आहे. तरीही उत्तम पाउस मानला जात आहे. त्यामुळे भुजलस्तरासोबचत जलाशयही तुडुंब भरले आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे मानल्या जाणार्या अप्पर वर्धा जलाशयात सध्या ४८०.३७ म्हणलेच ८५.१६ टक्के जलसाठा आहे. जो मागच्या वर्षीच्या तुलनेत ५७.७४ टक्के अधिक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील मोठे , मध्यम, लघु अशा ९० जलाशयात ७०.६८ टक्के जलसाठा आहे. पाण्याची ही स्थिती जिल्ह्याकरीता शुभसंकेत आहे. यंदा अप्परवर्धा धरणात पाउस सुरू झाल्यावर आतापर्यंत ४८०.३७ दलघमी म्हणजे ८५.१६ टक्के जलसाठा झाला आहे. २०१९ मध्ये यावेळेपर्यंत अप्पर वर्धा जलाशयात केवळ १५४. ६५ दलघमी म्हणजेच २७.४२ टक्केच जलसाठा झाला होता. यावर्षी झालेल्या उत्तम पावसामुळे मागिलवर्षीच्या तुलनेत ५७.७४ टक्के अधिक जलसाठा नोंद करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५ मध्यम धरणांचीही स्थिती उत्तम सांगण्यात येत आहे. शहानुर धरणात ३१.३५ दलघमी (६८.०९ टक्के) जलसंग्रह आहे. त्याचबरोबर चंद्रभागा धरणात २४.३७ दलघमी (४९.०८ टक्के) जलसंग्रह आहे, पूर्णा धरणात २४.९६ दलघमी (७०.५७ टक्के) जलसंग्रह आहे, सपन धरणात ३१.९७ दलघमी (५६.९२ टक्के) जलसंग्रह आहे, पंढरी धरणात ४.३३ दलघमी (७.६८ टक्के) जलसंग्रह आहे, अशा पाचही मध्यम धरणात यंदा १०६.९८ दलघमी म्हणजेच ४९.१५ टक्के जलसंग्रह आहे. मध्यम धरणात मागच्यावर्षी याहुन अधिक पाणी होते. सर्व मध्यम जलाशयात मागिलवर्षी १२३.७७ दलघमी म्हणजेच  ५६.८६ टक्के पाणी उपलब्ध होते. ८४ लघू जलाशयात यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत खुप अधिक पाणी आहे. यावर्षी १२६.८१ दलघमी म्हणजे ५५.४६ टक्के जलसंग्रह आहे. याच ८४लघु जलाशयांमध्ये २०१९ मध्ये केवळ ६२.५२ म्हणजेच २७.३४ टक्के पाणी होते. याप्रमाणे मोठे, मध्यम, लघु सारख्या ९० जलाशयात सरासरी १०१०.३६ दलघमी पाणी असायला हवे. यातील यंदा ७१४.१६ दलघमी म्हणजे ७०.६८ टक्के जलसंग्रह आहे. जो मागिलवर्षाहून अधिक आहे. मागिलवर्षी यावेळेपर्यंत सर्व जलाशयात केवळ ३४०.९४ दलघमी म्हणजेचे ३३.७४ टक्के पाणी होते. यावर्षी जलाशयात पुरेशा जलसाठ्यामुळे जिल्हा वासियांकरीता शुभसंकेत दिसुन येत आहे. जलाशयांमध्ये पाणी पुरेसे असण्यासोबतच भुजलस्तरही उत्तम सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button