बेळगाव दि . ८– बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (९ ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता; मात्र पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाब आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाब कमी झाला होता. मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीने शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात आला आहे; मात्र आता हाच पुतळा कर्नाटक सरकारने हटवला आहे.