मराठी

खासदार भावनाताई गवळी यांनी घेतली उध्दवजी ठाकरे यांची भेट

वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी निधीची मागणी

वर्धा दि २० – वर्धा यवतमाळ नांदेड या नविन रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. हा प्रकल्प केन्द्र तसेच राज्य सरकारच्या निधीमधून पुर्ण केला जात आहे. दरम्यान राज्य सरकारचा निधी अप्राप्त असल्यामुळे हा निधी लवकर रीलीज करण्याच्या मागणीसाठी खासदार भावनाताई गवळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची भेट घेतली. हा निधी लवकरच रीलीज करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी दिल्याने रेल्वेच्या कामातील अडचण आता दुर होणार आहे.
वर्धा यवतमाळ नांदेड या नविन रेल्वे प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्हयातील व्यापारी, नागरीक, शेतकरी यांना मोठया प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रामुख्याने शेतक-यांना विविध ठिकाणच्या बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर पुर्ण करण्यासाठी खासदार भावनाताई गवळी यांचे प्रयत्न सुरु आहे. वर्धा ते यवतमाळ पर्यन्त जवळपास मातीकाम पुर्ण झाले आहे. पुलांचे काम सुध्दा पुर्णत्वास आले आहे. काही तांत्रीक अडचण आल्यामुळे या भागात रेल्वे रुळ टाकण्याच्या कामात विलंब होत आहे. यवतमाळ पासून समोर मातीकामास लवकरच सुरुवात होणार आहे. या दरम्यान कोरोना मुळे राज्यावर आर्थीक संकट आल्याने निधीचा पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येते. अशाही परीस्थितीत शेतक-यांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्यामुळे खासदार भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची भेट घेऊन निदान 50 टक्के तरी  निधी रीलीज करण्याची मागणी केली आहे.

  • विविध विषयांवर चर्चा

मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची भेट घेऊन यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील नागरीकांच्या समस्या तसेच मागण्या त्यांच्यासमोर विषद केल्या. वाशिम येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नाकडे मी त्यांचे लक्ष वेधले. हा प्रश्न सुध्दा लवकर निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उध्दवजींचे सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. उध्दवजी ठाकरे हे मनमिळाऊ, नागरीकांच्या समस्यांची जान असणारे नेते आहे. त्यामुळे या भेटीने यवतमाळ लोकसभा मतदार संघातील अनेक समस्या तसेच प्रलंबित प्रश्न निकाली निघतील असा मला विश्वास आहे.

Related Articles

Back to top button