मराठी

खा. लोखंडे यांच्यासह कुटुंबीयांनाही कोरोना

नगरः खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande) यांच्यासह त्यांची पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. लोखंडे श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे राहतात. त्यांच्या वाहनचालकाला त्रास जाणवू लागल्याने त्याची कोरोनाची चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर लोखंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची आणि चालकाच्या संपर्कात आलेल्यांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्या वेळी लोखंडे आणि त्यांची पत्नी आणि मुलाचा कोरोना अहवाल होकारात्मक आला. लोखंडे यांच्या संपर्कातील आणखी दोघांचा अहवाल होकारात्मक आला. त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविले आहे. लोखंडे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात दौरे करीत होते. अलीकडेच श्रीरामपूर शहरातील एका मोठ्या कार्यक्रमातही ते इतर मान्यवर नेत्यांसमवेत उपस्थित होते. राहात्यातही त्यांनी आ. राधाकृष्ण विखे यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

Related Articles

Back to top button