मराठी
अनुसूचित जमातीच्या प्रश्नांवर राष्ट्रपतीकडे खासदार नवनीत राणा मागणार दाद
कोळी महादेव समाजाचे ढोल बजाव आंदोलनाणे वेधले खासदार, आमदारांचे लक्ष.
अमरावती दि २५ – तारीख २४ जानेवारी 2021 रोजी कोळी महादेव समाजावर शासन आकसबुद्धीने दुलक्ष करत आहे.याबाबतीत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी काल दिनांक24 जानेवारी 21 रोजी कोळी महादेव समाजाने ढोल बजाव आंदोलन करून दोघांचेही लक्ष त्यांच्या प्रश्नांकडे वेधून मागण्यांचे निवेदन दिले.असता खासदार नवनीत रवी राणा यांनी अन्यायग्रस्त कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या प्रश्नांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दाद मागितली जाणार असल्याची ग्वाही खासदार नवनीत
राणा यांनी आंदोलनाला सामोरे जातांना दिली. यां नंतर आमदार रवी राणा यांनी निवेदन स्वीकारून महाराष्ट्र राज्य कृती समितीचे नेतृत्वाखाली कोळी महादेव समाजासह 33 इतरही समाजाचे शिष्टमंडळ ज्या मध्ये उमेश ढोणे, प्रा बी के हेडाऊ, डॉक्टर महेंद्र काळे,पुरुषोत्तम खर्चाण, राजेंद्र जुवार, शंकर डोंगरे, आदींनी राज्यपालांच्या समक्ष कोळी महादेव समाजाच्या समस्या आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली मांडल्या चे या वेळी आमदार राणा यांनी उपस्थित पदाधिकारी यांना माहिती दिली.खासदार, आमदार राणाच्या निवासस्थानी ढोल बजाव आंदोलना मध्ये गजानन कासम्पूरे, कर्नल गाळे, मनोहर बुध, एकनाथ जुवार, संजय खर्चाण, दिनेश डवले, विनायक इंगळे, भाषकरराव कोलटेके, गजानन चुनकीकर, विजय इंगळे, अशोकराव डोंगरे, वंदनाताई जामणेकर, लताताई दहातोंडे, शारदाताई बुध, आदी कोळी महादेव सन्मानिय प्रमुख पदाधिकारी ढोल आंदोलन दरम्यान उपस्थित होते. खासदार नवनीत राणा लवकरच राष्ट्रपती यांचे कडे पत्रव्यवहार करणार, काहीं दिवसात विभागीय आयुक्त यांचे दालनात बैठक आयोजित करण्यात येईल असेही खासदार नवनीत राणा यांनी उपस्थितांना सांग