मराठी

श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

अमरावती दी /६- श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती  येथे 6 डिसेंबर  महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती ,  तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. संजय खडसे श्री शिवाजी  शिक्षण महाविद्यालय अमरावती प्रमुख वक्ते तसेच श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयमधील  माजी कार्यालयीन कर्मचारी श्री  शंकरराव राऊत  महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. उल्हास देशमुख डॉ. पुष्पलता देशमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून तसेच अभिवादन करून करण्यात आली व  उपस्थित मान्यवरांचे फुलाचे झाड देऊन स्वागत केले व मान्यवरांचा परिचय डॉ. पुष्पलता देशमुख यांनी दिलाकार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. पी. एस. सायर यांनी केले त्यांनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व त्यांच्याद्वारे केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शंकरराव राऊत यांनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष उल्लेख केला व त्यांच्या संपूर्ण जीवन चरित्रा विषयी ची माहिती दिली
त्यानंतर महाविद्यालमधील Dyed  प्रथम वर्षाची कु. समीक्षा  बर्वे या विद्यार्थिनीनी  महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व आपल्या मनोगणात व्यक्त केलेत्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. संजय खडसे सर यांनी मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेल्या मूलभूत हक्काविषयी व महिला सक्षमीकरण संबंधीची माहिती दिली
कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांनी समाजासाठी केलेले कार्य किती महान आहे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीचा अवलंब आपल्या जीवनात करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक रित्या आदरांजली वाहिली
वरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.सुशांत कुकडे यांनी केले . सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

Related Articles

Back to top button