मराठी

आशियायी श्रीमंतात मुकेश अंबानी अव्वल

शापूरजी मिस्त्री, हिंदुजांचाही श्रीमंतात समावेश

मुंबई दि १ – वीस आशियाई कुटुंबाजवळ 34 लाख 26 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. प्रथम क्रमांकावर अपेक्षेप्रमाणे भारतीय उद्योजक मुकेश अंबानी आहेत. ब्लूमबर्गच्या यादीत 20 कुटुंबांचा समावेश असून यात आणखी दोन कुटुुंबांची नावे आहेत. शापूरजी पालनजी मिस्त्री यांची संपत्ती एक लाख 63 हजार कोटी रुपये असून ते आठव्याा स्थानी आहेत. एक लाख 12 हजार कोटी रुपयांची संपत्ती असलेले हिंदुजा कुटुंब 16 व्या स्थानी आहे.
अंबानीकडे 2019 मध्ये तीन लाख 73 हजार कोटी रुपयांची संपत्ती होती. तेव्हाही ते पहिल्याच क्रमांकावर होते. एका वृत्तानुसार, कोरोनाच्या उद्रेकातही अंबानी यांच्या संपत्तीत एक लाख 85 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. साधारणपणे या 20 कुटंबात वर्षभरात 74 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनामुळे रियल इस्टेट व फायनान्समध्ये आलेल्या मंदीमुळे यातील निम्म्या कुबेरांना नुकसान झाले आहे. थायलंडचे चेरावेनॉँट व हाँगकाँगच्या अब्जाधीश कुटुंबाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत रियल इस्टेट डेव्हलपमेंट होते. कोरोनामुळे श्रीमंत-गरीबांतील अंतर आणखी वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांत असंतोष पसरला आहे. थायलंडमध्ये राजेशाहीला विरोध हाच मोठा पुरावा आहे. कोरोना पसरत गेल्याने असमानता वाढत गेली. सामाजिक भेदभाव आणि संधी नसल्याने त्यांच्यात निराशा आणखी वाढत गेली.
चौकट

  • यादीत समाविष्ट प्रमुख तीन कुटुंबे आणि त्यांची संपत्ती

अंबानी कुटुंब (भारत), (5.62 लाख कोटी)
क्वॉक कुटुंब (हाँगकाँग), (2.44 लाख कोटी)
चेरावेनाँट कुटुंब (थायलंड), (2.35 लाख कोटी)

Related Articles

Back to top button